Dhule : करपलेली पिके घेऊन शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Dhule : करपलेली पिके घेऊन शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात (Video)

 धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील 4 विद्युत रोहित्रे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे

टोमॅटोचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता
जनावरांचे बाजारासह बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील
सांगवी पाटण येथील शेतकर्‍यांचे अवकाळी पावसामुळे झाले नुकसान…

 धुळे तालुक्यातील देवभाने शिवारातील 4 विद्युत रोहित्रे कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान ग्रस्त पिके हातात घेऊन वीज कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात देवभाने शिवारातील 150 शेतकरी चक्क ट्रॅक्टर्स जिल्हाधिकारी कार्यालयात घुसवल्यानी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहन तळावर ट्रॅक्टर लावून यावेळी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त केला.
या भागातील दीडशेहून अधिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, वीज पुरवठा खंडित केल्याने पिके करपून गेले आहेत. शेतकऱ्यांनी वेळोवेळी विजेचे बिल भरले आहेत .तरी वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी करपलेली पिके आणून वीज वितरण कंपनीचा निषेध व्यक्त केला.

COMMENTS