महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच्या सभेला तुफान प्रतिसाद… राऊत म्हणाले, खासदार शिवसेनेचाच होणार…

Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्राबाहेर शिवसेनेच्या सभेला तुफान प्रतिसाद… राऊत म्हणाले, खासदार शिवसेनेचाच होणार…

प्रतिनिधी : सिल्वासा दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला म

न्यायालयाकडून संजय राऊतांना मोठा झटका
कायदा मंत्रिपदावर बसू शकेल अशी व्यक्तीच केंद्राकडे नाही – संजय राऊत
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी : सिल्वासा

दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेने कंबर कसली आहे. दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. 

आज शिवसेनेकडून प्रचार सभा घेण्यात आली. दादरा नगर-हेवलीत एक ज्येष्ठ खासदार आपले जीवन संपवतो. ही धक्कादायक घटना असून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आलेले नाही.

आता महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची चौकशी करणार आहे. भाजपचे अनेक लोक या प्रकरणाशी संबंधित आहेत; कारण डेलकर यांच्या चिठ्ठीत अनेकांची नावे आहेत. इतकेच नाही तर स्थानिक प्रशासकाचेही त्यात नाव आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे, 

ही जागा जिंकतोय आणि विजयी सभेला उद्धव ठाकरे येतील, असा विश्वासही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. फडणवीसांनी घेतलेल्या प्रचार सभेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रातील खंडणीखोर आणि वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला होता.

यावरही राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला खंडणीखोर म्हणत असाल तर इथे भाजप प्रशासक खंडणीखोरीवर फडणवीस बोलत नाहीत? इथली जनता त्रस्त आहे. म्हणून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली. 

मिस्टर फडणवीस खंडणीखोर सैतानाची तरफदारी करत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. दादरा नगर-हेवलीतील मराठी मतदान भाजपच्या पारड्यात पडेल, असे फडणवीस यांना वाटत आहे, मात्र तो त्यांचा गैरसमज आहे. इथली मराठी जनता पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी आहे, असा दावाही राऊतांनी केला.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला टार्गेट करण्यात येत आहे. आम्ही तोंड उघडले तर दिल्लीतील, महाराष्ट्रातील पाच वर्षांची, गुजरातमधील २० वर्षांतील  दलाली काय? याचा खरा अर्थ देशाला कळेल. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे.

 एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर नबाव मलिक जे आरोप करीत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . यासंदर्भात चौकशी होणे गरजेचे आहे. ते  केंद्र सरकारपुढे झुकणार नाही हे दाखवून देण्याची हीच खरी वेळ असल्याचे राऊत म्हणाले.

COMMENTS