कल्याण – डोंबिवलीतील दफनभूमी अन्य समाजाला देण्याचा घाट (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कल्याण – डोंबिवलीतील दफनभूमी अन्य समाजाला देण्याचा घाट (Video)

गेले काही महिन्या पासून  कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी दफनभूमीची मागणी करत पालिकेला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महा

स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करताना !
प्रवीण तरडेंनी केली ‘धर्मवीर 2’ची घोषणा
जिवाणू खते व माती,पाणी परीक्षण मूळे शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल – ना.गडाख

गेले काही महिन्या पासून  कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी दफनभूमीची मागणी करत पालिकेला आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महानगरपालिकेने मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीची जागा शोधण्यास सुरुवात केली  कल्याण डोंबिवलीतील विविध दफनभूमी व आरक्षित जागेची पाहणी महानगरपालिकेकडून केली जात आहे डोंबिवली येथील देवीचा पाडा परिसरात आरक्षण क्र. 309 C.G. या भूखंडावर असलेलीi दफनभूमी जी  गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदूंची वहिवाट आहे 

या ठिकाणी पालिका कर्मचारी पाहणीसह मोजमाप करण्यात येत असल्याचे कळताच शेकडोंच्या संख्येने रहिवाश्यांसह ग्रामस्थांनी पालिका  पथकाला गराडा घातला व केडीएमसीच्या पथकाला हाकलून लावले शेकडो वर्षांपासून सुरू असलेली ही स्मशानभूमी ज्यांच्यासाठी आरक्षित आहे त्यांनाच वापरू द्यावे इतर जातीचं आरक्षण याठिकाणी टाकू नये अन्यथा उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी देत पालिका आयुक्तांना निवेदन दिले यावेळी पोलिस पाटील लक्ष्मीकांत भोईर,यांच्यासह  ग्रामस्थ देखील उपस्थित होते

COMMENTS