वायुसेनेचे मिराज-2000 कोसळले, पायलट सुरक्षित

Homeताज्या बातम्यादेश

वायुसेनेचे मिराज-2000 कोसळले, पायलट सुरक्षित

भिंड : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये भारतीय वायुसेनेचे मिराज-2000 हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. जिल्ह्यातील बागडी गावात ही घटना घडली. अपघाताच्या वेळी फ

राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा !
 एससी-एसटी आरक्षणातील क्रीमिलेयर विरोधात
नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकरचे छापे

भिंड : मध्य प्रदेशातील भिंडमध्ये भारतीय वायुसेनेचे मिराज-2000 हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. जिल्ह्यातील बागडी गावात ही घटना घडली. अपघाताच्या वेळी फ्लाइट लेफ्टनंट अभिलाश हे विमान उडवत होते. विमान कोसळण्यापूर्वी अभिलाश यांनी वेळीच उडी मारल्यामुळे ते सुखरूप वाचले. दरम्यान अभिलाश यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून आज, गुरुवारी सकाळी मिराज-2000 ने टेक ऑफ केले. विमान हवेत असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला. विमान अनियंत्रित होऊन खाली कोसळले. तत्पूर्वी वैमानिक फ्लाईट टेफ्टनंट अभिलाश यांनी विमानातून उडी घेतल्यामुळे ते सुखरूप राहिले. ग्वाल्हेर येथील एअरबेसच्या अधिकार्‍यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाच्या वतीने सांगण्यात आले. लडाऊ विमान कोसळल्यानंतर जोरात आवाज झाल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. गावकर्‍यांनी शेताच्या दिशेने धाव घेतली असता शेतात खोल खड्डा पडला होता. तसेच विमान पूर्णपणे जळाल्याचे दिसले.

COMMENTS