पाण्यासाठी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसह नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्यासाठी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसह नगरसेवकांचा ठिय्या आंदोलन

अहमदनगर प्रतिनिधी:  प्रभाग क्रमांक एक हा सावेडीतील उपनगरातील नव्याने विस्तारित होणारा प्रभाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहे.

तुळजाभवानी देवीचा पलंगाचे नगर शहरात आगमन
वित्त आयोग निधी अपहारप्रकरणी सरपंचासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
Ahmednagar : वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्जत तालुक्यातील डॉक्टरांचा सन्मान

अहमदनगर प्रतिनिधी: 

प्रभाग क्रमांक एक हा सावेडीतील उपनगरातील नव्याने विस्तारित होणारा प्रभाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहे. या नागरिकांचे प्रश्‍न मार्गी लागावे यासाठी आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करीत असतो. परंतु अधिकाराच्या हलगर्जीपणामुळे ढवण वस्ती व तपोवन हडको परिसरामध्ये अनेक दिवसापासून तीव्र स्वरूपाचा पाणीप्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पाण्यासाठी वणवण भटकती करावे लागते. याच बरोबर या भागातील रस्त्यांचा प्रश्न ही तीव्र स्वरूपाचा बनला आहे. तरी आयुक्त शंकर गोरे यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालून येत्या पंधरा दिवसात पाणी व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा नागरिकांसह नगरसेवक महापालिकेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर यांनी दिला.

        प्रभाग क्रमांक एक मधील ढवण वस्ती व तपोवन हडको परिसरातील पाणी व रस्त्यांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्यासाठी आयुक्त शंकर गोरे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर. स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेविका दिपाली बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण, सतीश ढवण,स्वप्नील ढवण, सागर ढवण,चेपस ढवण,अशोक ढवण, रंजना उकिरडे, साधना बोरुडे, हेमलता कांबळे, स्मिता मगर, नीलम धोंडे, पल्लवी पलंगे उज्वला टेकाळे आदी उपस्थित होते.

       स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले म्हणाले की प्रभाग क्रमांक एक हा नव्याने विकसित होणारा प्रभाग आहे. या ठिकाणी मूलभूत प्रश्नापासून विकास कामे करावी लागत आहे.तरी प्रभाग एक साठी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा असे ते म्हणाले.

        आयुक्त शंकर गोरे यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले की नागरिकांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीप्रश्न ताबडतोब मार्गी लावला जाईल. तसेच रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी जसा जसा निधी उपलब्ध होईल तसे तसे रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावू. यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, पाणीपुरवठा विभाग प्रमुख रोहिदास सातपुते इंजिनियर, इंजि. मनोज पारखे, आदी उपस्थित होते.

       नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे. नगरसेविका दीपाली ताई बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण यांनी प्रभागातील विविध मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आयुक्तांचे लक्ष वेधले.

COMMENTS