स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्टेट बँकेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील

नगर – भारतीय स्टेट बँक देशाच्या अर्थक्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ मधील बँकेच्या शाखेचा शेतकरी व सर्वसामान्य ना

अहमदनगर क्लबवर एकता पॅनलचे वर्चस्व ; सचिवपदी नरेंद्र फिरोदिया
नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्याने कोपरगावात जल्लोष
जामखेडमध्ये नवनियुक्त खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन

नगर – भारतीय स्टेट बँक देशाच्या अर्थक्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ मधील बँकेच्या शाखेचा शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आधार देत असून बँकेच्या योजनांचा चांगला लाभही होत आहे, असे प्रतिपादन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.

          भारतीय स्टेट बँकेच्या राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील नुतनिकृत शाखेचे लोकार्पण कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील व स्टेट बँकेचे राज्याचे महाप्रबंधक राजेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी बँकेचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा, क्षेत्रीय प्रबंधक विनोद कुमार, विद्यापीठाचे नियंत्रक श्री.बलमे, सह नियंत्रक श्री.शेजूळ, डॉ.एम.जी.शिंदे, प्रा.डॉ.अंत्रे, डॉ.एस.आर.मोरे, बँकेचे शाखा व्यवस्थापक जनार्धन बोंतले आदी उपस्थित होते. यावेळी अपघाती निधन झालेल्या बँकेच्या ग्राहकाच्या वारसदारांना २० लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. महाप्रबंधक राजेश कुमार म्हणाले, देशात शहरी व ग्रामीण भागात भारतीय स्टेट बँकेचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. करोना महामारीच्या संकटात बँकेने हजारो कोटी रुपयांचे वितरण केले आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकच्या भरपूर योजना आहेत. या योजनाचा लाभ सर्व नागरिकांनी घेवून स्वतःसह कुटुंबियांचे जीवन सुरक्षित करावे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे महान कार्य पाहून प्रभावित झालो आहे. बँकेच्या माध्यमातून सर्वप्रकारचे सहकार्य विद्यापीठाला करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी महाप्रबंधक राजेश कुमार, बँकेचे उपमहाप्रबंधक रवीकुमार वर्मा,  क्षेत्रीय प्रबंधक विनोद कुमार यांनी कृषी विद्यापीठाच्या विविध प्रोयोग शाळांना भेट देवून पहाणी केली. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी सर्वाना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. येथील बेकरी मध्ये तयार झालेल्या औषधी बिस्कीटांचा आस्वाद सर्वांनी घेतला.

COMMENTS