ज्ञानयज्ञ तेवत ठेवा ः झावरे… जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचा दसरा महोत्सव

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानयज्ञ तेवत ठेवा ः झावरे… जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचा दसरा महोत्सव

नगर तालुका, ता. १५ ः  जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाने गेली शंभर वर्षापासून अधिक काळ तळागालातील बहुजन समाजासाठी शिक्षणाचा ज्ञानयज्ञ प्रज्वलित के

रेनबो स्कूलमध्ये स्वच्छता मोहीम उत्साहात
राजूर पोलिसांचा विशेष कामगिरीमुळे गौरव
धुम स्टाईलने वृद्धेच्या गळ्यातील गंठण लांबविले

नगर तालुका, ता. १५ ः 

जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाने गेली शंभर वर्षापासून अधिक काळ तळागालातील बहुजन समाजासाठी शिक्षणाचा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला आहे. त्यासाठी संस्थेच्या अनेक संचालकांनी आपले भरिव योगदान दिले आहे. शिक्षण क्षेत्रात राज्यात आग्रगण्य असलेल्या जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचा ज्ञानयज्ञ सतत तेवत ठेवण्याचे काम अपणा सर्वांना करावयाचे असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी दसरा महोत्सवाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.

जिल्हा मराठा संस्थेच्या विविध १२० शाखा संस्थां महाविद्यालये, विद्यालये, इंन्सिट्युट मधून ७५ हजार विद्यार्थी ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. यांना ज्ञानदान करणाऱया ४ हजार शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी या आपल्या मातृसंस्थेचा लौकिक अधिकाअधिक वाढवावा.

असे अवाहन त्यांनी या वेळी उपस्थीतांना केले.

या दसरा महोत्सवात संस्थेचा अढावा सादर करताना सचिव जी. डी. खानदेशे यांनी बदलत्या शिक्षण प्रणालीचा संस्थेला कसा वापर करता येईल या बाबत मार्गदर्श केले. ॲड. विस्वासराव आठरे यांनी शिक्षण क्षेत्रातील आपल्या कामाकडे राज्याचे लक्ष आहे. आपण स्वायत झालो आहोत यापुढील कालात अधिक जबाबदारीने आपली कर्त्यव्य पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकजुटीने काम गकेले पाहिजे असे मत व्यक्त केले. या सदरा महोत्सवास संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे,विश्‍वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, दिपक दरे, सिताराम खिलारी, अरूणा मुळे, अभय खानदेशे, राहुल झावरे, ॲड. माणिकराव मोरे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, अशोक दोडके, एम.एम. तांबे, डॉ. महेश नगरकर यांच्यासह सर्व संस्थांचे उपप्राचार्य, प्राद्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अपस्थीत होते.

अध्यक्ष झावरे पुढे म्हणाले, अगामी काळात जागतीक दर्जाची काजगी विद्यापिठे उभी राहतील, संस्ता ही आपली माता आहे. जिचे आफण राज्यभर नावलौकिक केला आहे. सातत्याने सिक्षण क्षेत्रातील बदल आपण आत्मसात करून स्वतःला व आपल्या विद्यार्थांना कायम अपडेट ठेवावे लागणार आहे. अपडेट राहीलोतरच आपण भविष्यात टिकणार आहोत. स्वतःचे वाद विसरून एकीने चांगले काम करत रहा असे सांगतानाच त्यानी उपस्थीत सर्वांना दसऱयाच्या शुभेच्छा दिल्या. या दसरा महोत्सवात एसएससी, एचएससी तील गुणवंत विद्यार्थी व निवृत्त प्राचार्य मुख्याध्यापक यांचा सन्मानचिन्ह देभन गौरव करण्यात आला. कार्यक्रमनाचे प्रास्तविक रेश्‍डेंन्सिअलचे प्राचार्य असोक दोडके यांनी प्रास्ताविक केले तर अभार उपप्राचार्य लतिका भापकर यांनी मानले.

COMMENTS