परतीच्या पावसाने वाघवाडी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जामगावला जोरदार पाऊस

Homeअहमदनगर

परतीच्या पावसाने वाघवाडी परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जामगावला जोरदार पाऊस

भाळवणी (प्रतिनिधी):-  पारनेर तालुक्यातील वाघवाडी (ढवळपुरी) परिसरात शुक्रवारी सायंकाळी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांच

मांडओहळ धरण सलग तिसऱ्या वर्षी ‘ओव्हर फ्लो’
ठेवीदारांचे पैसे देण्यास नव्या संचालकांची आडकाठी?
कर्जतच्या प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन 

भाळवणी (प्रतिनिधी):- 

पारनेर तालुक्यातील वाघवाडी (ढवळपुरी) परिसरात शुक्रवारी सायंकाळी गारपिटीसह वादळी पाऊस झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. 

काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्यांचे ऊस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने तातडीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. 

त्याचप्रमाणे जामगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने याठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. या परतीच्या पावसाने काही ठिकाणी नुकसान झाली असली तरी अद्याप भाळवणी परिसरातील काही गावांमध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

COMMENTS