कोरोना काळात शिक्षकांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- सभापती गणेश शेळके

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोना काळात शिक्षकांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- सभापती गणेश शेळके

पारनेर प्रतिनिधी-  तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाने वेगवेगळ्या माध्यमातून आपली भुमिका बजावली आहे लाॅकडाऊन असूनही शिक्षकांनी गुणवत्तेची कास सोडली नाह

ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
नगरकरांचं टेन्शन वाढलं , हा तालुका पुन्हा कोरोना हॉटस्पॉट वर ! l Ahmednagar l LokNews24 l
जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची वाटचाल सहा हजारांकडे

पारनेर प्रतिनिधी- 

तालुक्यातील प्रत्येक शिक्षकाने वेगवेगळ्या माध्यमातून आपली भुमिका बजावली आहे लाॅकडाऊन असूनही शिक्षकांनी गुणवत्तेची कास सोडली नाही तुम्हाला कोरोना काळात शिक्षकांची शैक्षणिक कार्य कौतुकास्पद राहिले असल्याचे पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आणि गुरु माऊली मंडळ महिला आघाडी उच्चाधिकार समिती पारनेर यांचे संयुक्त विद्यमाने पारनेर तालुक्यातील आकरा विद्यार्थ्यांचे नवोदय प्रवेश पात्रता परिक्षेतून निवड झाल्याबद्दल सत्कार सन्मान सोहळा घेण्यात आला. यावेळी पारनेर पंचायत समितिचे गट विकास अधिकारी किशोर माने यांनी शिक्षकांनी कोरोना काळात देखील उल्लेखनीय कामगिरी केली याचे उदाहरण म्हणजे तालुक्यातून सुमारे आकरा विद्यार्थी नवोदय विद्यालयासाठी निवड होत आहे.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत पठारे होते त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना विद्यार्थ्यांनी गुणवत्तेबरोबर उत्तम खेळाडू बनावे  तसेच कोरोना काळात काळात डाॅ. बरोबर खांद्याला खांदा लावून शिक्षकांनी काम केले. विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात कोरोना काळात अग्रस्थानी काम करणारे अधिकारी पदाधिकारी यांचा कोरोना योद्धा म्हणून शिक्षक संघटनेच्या वतीने सन्माननीत करण्यात आले. यामध्ये गटविकास अधिकारी किशोर माने, सभापती गणेश शेळके डॉ श्रीकांत पठारे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना कोरोना योद्धा म्हणून शिक्षक संघटनेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 

 यावेळी नवोदय मध्ये निवड झालेले विद्यार्थी आर्यन कानिफ गायकवाड, यश राजकुमार जावळे, अभिनव किशोर सानप, आयूश दिपक शेळके, शुभम शिवाजी पानसरे, तन्वी अंकूश सोनवणे, उत्कर्षां रावसाहेब शेंडे अनुष्का अरुण गजरे, समर्थ बाळासाहेब बेहडे, उत्कंर्षा तुषार केदार, सर्वेश नरसाळे आणि यांना मार्गदर्शन करणारे ज्योती साबळे पवारवाडी, सतीष भालेकर पिंप्री जलसेन, पोपट कदम अनिता कदम ढवळदरा, दिलीप बेलोटे देविभोयरे. आदींना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी प्राथमिक शिक्षक संघ कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर, शिक्षक बॅकेचे विद्यमान व्हाईस चेअरमन गंगाराम गोडे, संघाचे कार्याध्यक्ष राजेद्र सदगीर, राम वाघचौरे, संचालक सुयोग पवार,कारभारी बाबर, तालुका अध्यक्ष सुर्यकांत काळे, सुरेश निवडूंगे गौतम साळवे, मंगेश खिलारी, आबासाहेब दळवी, रविंद्र रोकडे, राजू आतार,अशपाक शेख,अनिल इकडे, चंद्रकांत गट,बाळासाहेब जऱ्हड,बाळासाहेब रासकर, आदर्श शिक्षक बाळासाहेब शिंगोटे, रामदास नरसाळे,गणेश कोहकडे, दिलीप बेलोटे, रामदास पाचरे, नारायण बाचकर केंद्रप्रमुख येवले,पंचशील साळवे,विशाल उमाप,रामदास चौरे,संजय गायकवाड,अरुण गजरे,तुषार केदार,दत्तात्रय मेमाणे,साहेबराव कदम,दिनकर ढोकळे आदी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रस्ताविक संघ अध्यक्ष श्री.सुर्यकांत काळे यांनी केले. सुत्रसंचालन मंगेश खिलारी यांनी केले तर आभार चंद्रकांत गट यांनी मानले.

COMMENTS