स्पर्धा परीक्षांसाठी युवकांनी सक्षम व्हावे -विकास सावंत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांसाठी युवकांनी सक्षम व्हावे -विकास सावंत

बेलापूर- (प्रतिनिधी) -  महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शनाअभावी मागे पडतात .खाजगी क्षेत्रामध्ये आज नोकऱ्यां

म.गांधी व लालबहाद्दूर शास्ञी यांचे जीवन कार्य प्रेरणादायी; माजी आ.मुरकुटे
श्रीरामपूरात पहिल्यांदा कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन दोन्ही लसींचे एकत्रित शिबीर
शिव प्रहार संघटनेच्या चिथावणीखोर वक्तव्याचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने निषेध नोंदवून कारवाई करण्याची मागणी

बेलापूर- (प्रतिनिधी) – 

महाराष्ट्रातील महाविद्यालयीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शनाअभावी मागे पडतात .खाजगी क्षेत्रामध्ये आज नोकऱ्यांचा  अभाव निर्माण होत आहे तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये नोकरी विषयी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे .बदलत्या काळामध्ये वशिला आणि पैसे भरून मिळणाऱ्या नोकऱ्या राहिल्या नाहीत. त्यामुळे आज स्व कर्तुत्वावर नोकरी मिळविणे गरजेचे झाले आहे .

असे विचार विकास सावंत यांनी व्यक्त केले. बेलापुर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर तसेच नेट स्कूल प्रज्ञा अकॅडमी व विकास सावंत अकॅडमी मुंबई आयोजित “करियर इन बँकिंग अॅण्ड इनशुरन्स “या मोफत वेबिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विकास सावंत हे बोलत होते .यावेळी संस्थेचे सचिव अॅड.शरद सोमाणी तसेच महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड आयोजक संजय पाठक, प्रभाकर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

विकास सावंत पुढे म्हणाले की ,पदवीला प्रवेश घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. आजच्या आधुनिक काळात बँकिंग व विमा क्षेत्रातील परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. या क्षेत्रामध्ये आजच्या घडीला नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून या परीक्षा देताना त्यातील बारकावे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. 

म्हणून भरपूर मेहनत करून यश मिळविणे हे आयुष्य क्रमासाठी अत्यंत गरजेचे आहे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. हरिश शेळके यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. प्रवीण डौले यांनी केले . सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापक इतर सेवक, विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS