मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांडओहोळ धरण भरले, धबधबे सुरु – पर्यटकांचे आकर्षण ठरणार

नगर : प्रतिनिधीनगर कल्याण रोडवर पारनेर तालुक्यातील नागरपासून ५० कि मी वर असणारे मांडओहळ मध्यम प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग तिसर्‍या

जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची वाटचाल सहा हजारांकडे
कोरोना काळात शिक्षकांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद- सभापती गणेश शेळके
ग्रामसेवक व पाणी स्वच्छता समितीचे अध्यक्षांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नगर : प्रतिनिधी
नगर कल्याण रोडवर पारनेर तालुक्यातील नागरपासून ५० कि मी वर असणारे मांडओहळ मध्यम प्रकल्प आज पूर्ण क्षमतेने भरुन वाहू लागला. सलग तिसर्‍या वर्षी मांडओहोळ धरण भरल्याने पर्यटकांसह शेतकरी तालुका वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मांडओहळ प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. पळसपूर, नांदुरपठार, सावरगाव परिसरासह मांडओहळ प्रकल्पाच्या पाणलोटक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात आज अखेर 399 पैकी 380 दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.गेल्या वर्षी 20 ऑगस्ट रोजी धरण पुर्ण क्षमतेने भरले होते. यावर्षी मात्र पावसात सातत्य नसल्याने गेल्या वर्षिच्या तुलनेत मांडओहळ दीड महिना उशिराने भरले.

मागील वर्षी धरण परिसरा मध्ये कोरोना मुळे पर्यटकांना जाण्यास बंदी होती ,फक्त पाहण्यास परवानगी होती यावर्षी मात्र या ठिकाणी पाण्यात भिजण्यासाठी पर्यटक गर्दी करतील त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे येथे जवळच असलेला रुईचोंढा धबधबा नगरसह पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरतो, मात्र गेल्या वर्षी रुईचोंढा धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पाच पर्यटकांचा विविध घटनांमध्ये धबधब्या खाली असलेल्या डोहातबुडून मृत्यू झाला होता.त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेण्याचे गरज आहे

COMMENTS