आ. रोहित पवार यांनी घेतला कर्जत- जामखेडच्या महसूल विभागाचा आढावा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवार यांनी घेतला कर्जत- जामखेडच्या महसूल विभागाचा आढावा

कर्जत : प्रतिनिधी आमदार रोहित पवार यांनी महसुल प्रशासकीय कामकाजाबाबत कर्जत येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले, कर्जतचे तह

लोककलावंत शांताबाई लोंढे यांचा 5 लाख देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
कुटुंबीयांना वाळीत टाकत केला तीन लाखांचा दंड
पुणतांब्यात आज रेल्वे रोको आंदोलन

कर्जत : प्रतिनिधी

आमदार रोहित पवार यांनी महसुल प्रशासकीय कामकाजाबाबत कर्जत येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रांताधिकारी अजित थोरबोले, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, जामखेडचे तहसीलदार योगेश चन्द्रे, नामदेव राऊत आदी उपस्थित होते.

यावेळी महसुल विभागाकडून राबविण्यात आलेल्या आणि येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. पुढील तीन महिन्यामध्ये महसुल विभागाव्दारे महाराजस्व अभियानाअंतर्गत विविध दाखल्यांचे वाटप, रेशन कार्ड वितरीत करणे व ऑनलाईन करणे, विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी निवडणे, त्यांची संख्या वाढविणे, शिवरस्ते, पानंद रस्ते मोकळे करुन त्यांची अभिलेखमध्ये नोंद करणे, दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी मंडळाच्या ठिकाणी फेरफार अदालत घेणे, मोफत सातबारा वाटप करणे, तलाठी यांच्या उपस्थितीबाबत वेळापत्रक करुन त्याप्रमाणे उपस्थिती ठेवणे, तलाठी दत्पर तपासणी, पिक पाहणी, पोट खराबा, तालुक्यातील प्रत्येक विभाग प्रमुख अधिकारी यांनी प्राधान्य क्रमांचे एक विशेष काम हाती घेणे, राष्ट्रीय महामार्गाच्या भुसंपादन व मोबदल्याबाबत माहिती देण्यात आली.

विजय सप्तपदी अभियानाअंतर्गत महसुल विभागाव्दारे पोटखराबा लागवडीखाली आणण्याबाबतची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. त्याद्वारे उताऱ्यावर अ वर्ग म्हणुन नमुद असलेल्या पोटखराब्याचे क्षेत्र लागवडीलायक क्षेत्रात आणण्यात येत आहे. त्याच बरोबर अतिक्रमीत रस्ते मोकळे करणे, तुकडे झालेले क्षेत्र नियमानुकुल करणे, महाआवास योजनेतील घरांसाठी जागा उपलब्ध करून देणे आणि गावांमध्ये दफन भुमी/स्मशानभुमीसाठी जागा नसल्यास ती उपलबध करुन देणे याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आ. पवार तसेच अधिकारी यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

COMMENTS