अहमदनगर : प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी विविध संधी उपलब्ध आहे. या संधीचे सोने करण्यासाठी ध्येय निश्चित करण
अहमदनगर : प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना करियर करण्यासाठी विविध संधी उपलब्ध आहे. या संधीचे सोने करण्यासाठी ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. मेहनत व चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर नक्कीच गाठता येते. सुरज गुंजाळ यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ३५३ वी रॅंक मिळवली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील सुरज गुंजाळने कमी वयात ISA अधिकारी होण्याचा मान मिळवला ही बाब कौतुकास्पद आहे. इतर विद्यार्थ्यांनीही सुरज गुंजाळ या विद्यार्थ्याचे अनुकरण करून आपल्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी.
सुरजचे वडील भाऊसाहेब गुंजाळ हे नगरच्या एमआयडीसी मध्ये खाजगी कंपनीत नोकरी करीत असू्न आई शोभा गुंजाळ गृहिणी आहे. या हलाखीच्या परिस्थितीतही एवढे मोठे यश संपादन करणे कठीण असल्याचे असे प्रतिपादन स्वराज्य कामगार संघटना व सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केले.
नवनागापूर गजानन कॉलनी येथील सुरज भाऊसाहेब गुंजाळ याने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत ३५३ वी रॅंक मिळवल्याबद्दल स्वराज्य कामगार संघटना व स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करताना अध्यक्ष योगेश गलांडे , नवनागपूर सरपंच बबनराव डोंगरे ,मा.पंचायत समिती सदस्य राजू शेवाळे ,ग्रामपंचायत सदस्य दीपक गीते ,शंकर शेळके , सुनील शेवाळे, राम घाडगे , प्रदीप कारंडे ,विवेक घाडगे , आमोल शेवाळे, नरेश शेळके ,काव्हाणे मामा , प्रदीप दहातोंडे , स्वप्नील खराडे , शशिकांत संसारे , भास्कर गव्हाणे , संतोष गव्हाणे आदी उपस्थित होते.
सुरज गुंजाळ सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की २०१९ मध्ये सिंहगड कॉलेज पुणे येथून इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण केले , त्यानंतर युपीएससीची तयारी सुरु केली. अभ्यासक्रमाला प्राधान्यक्रम दिला. व पहिल्याच परीक्षेत ISA होण्याचा मान मला मिळाला या यशामध्ये यामध्ये विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे असे ते म्हणाले.
COMMENTS