ढवण वस्ती येथे लसीकरण व सर्व रोग मोफत निदान शिबिराचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ढवण वस्ती येथे लसीकरण व सर्व रोग मोफत निदान शिबिराचे आयोजन

अहमदनगर : प्रतिनिधी नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोणाच्या महाभयंकर संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले होते. दिवसें

अहमदनगर शहरात दहशतीचे वातावरण… सावेडीत जागा खाली करण्यासाठी गुंडांची दहशत
12 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा
आघाडी सरकारमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणावर मतभेद l पहा LokNews24

अहमदनगर : प्रतिनिधी

नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोणाच्या महाभयंकर संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले होते. दिवसेंदिवस आरोग्य सेवा महागडी होत चालली आहे सर्वसामान्य नागरिकांना योग्य ते उपचार घेणे परवडत नाही.

यासाठी विविध आजारांचे सर्वरोग निदान मोफत शिबिराचे आयोजन होणे ही काळाची की गरज आहे. यासाठी ढवण वस्ती येथे मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली व मनपा आरोग्य समितीच्या वतीने नगर शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आम्ही सर्वजण काम करत आहोत. नगर शहरातील नागरिकांचे लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी प्रभागनेहा लसीकरण मोहीम हाती घेतली असल्याचे प्रतिपादन प्रभाग समितीचे अध्यक्ष डॉ सागर बोरुडे यांनी केले.

ढवण वस्ती येथे सर्वरोग निदान शिबिर व कोरणा प्रतिबंधक लसीकरणाचे आयोजन भोलेश्वर मित्र मंडळ, सन फार्मा कमिटी हेल्थ सेंटर, मनपा आरोग्य समितीच्या वतीने संपन्न झाले, नगरसेवक डॉ सागर बोरुडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेविका मीनाताई चव्हाण,नगरसेविका दीपाली ताई बारस्कर, स्वप्नील ढवण, सतीश ढवण, विलास ढवण, सागर ढवण, अशोक चेपसे, अशोक ढवण रामदास ढवन, दिलीप ढवन, विकी ढवण, प्रशांत काराळे, पंकज कुलकर्णी, अंकुश रोकडे,विक्रम शिंदे, भरत सोनवणे, अमोल लोणकर, नीलेश निकम, सचिन गांधी, प्रशांत नेटके, आदी उपस्थित होते

COMMENTS