Solapur : करमाळा ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : करमाळा ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटनेचे आंदोलन (Video)

आज  ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना करमाळा यांचे वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज एक दिवसीय लक्षणिक उपोषण पंचायत समिती कार्यालयासमोर करण्

पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्याला टेम्पोनी दिली जोराची धडक l LokNews24
Solapur : ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात (Video)
Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

आज  ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना करमाळा यांचे वतीने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून आज एक दिवसीय लक्षणिक उपोषण पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आले .  यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते. हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केलेले आहे. आज करमाळा पंचायत समिती कार्यालयाच्या समोर ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना करमाळा यांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायतीमध्ये शासकीय सेवेत कायम करून घेणे ,ग्रामरोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करणे, ग्रामरोजगार सेवकांना तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास व स्टेशनरी भत्ता मिळणे, ग्रामरोजगार सेवकांना विनाकारण व सूडबुद्धीने बदलण्यात येऊ नये तसेच सर्व ग्राम रोजगार सेवकांना विमा संरक्षण लागू करणे आदी मागण्या बाबत हे आंदोलन करण्यात आले  या ठिकाणी करमाळा पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने , कक्ष अधीक्षक जाधव एस. एच ,गणेश गवळी, एमआरजीएस चे दादा मोरे यांनी या ग्राम रोजगार सेवक यांनी दिलेल्या आंदोलनाचे निवेदन स्वीकारले. 

COMMENTS