Solapur :अवैध दारू व्यावसायीकांचे झाले मन परिवर्तन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur :अवैध दारू व्यावसायीकांचे झाले मन परिवर्तन (Video)

सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सुरू केलेले मिशन परिवर्तन मोहीम राबण्यात आले.  ह

पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्याला टेम्पोनी दिली जोराची धडक l LokNews24
solapur : वाळू चोरीला लगाम घालू ; पोलिस महानिरीक्षक (Video)
Madha : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (Video)

सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सुरू केलेले मिशन परिवर्तन मोहीम राबण्यात आले.  हातभट्टी दारू ची विक्री करणे तसेच दारू तयार करणाऱ्या लोकांना त्या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाणे हद्दीत अधिकारी व कर्मचारी यांना एक गाव दत्तक देऊन त्या लोकांना इतर चांगल्या व्यवसायात आणण्याचे काम सुरू आहे. स्वतः पोलीस अधीक्षक सातपुते यांनी मुळेगाव तांडा हे गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी परिवर्तन मोहीम राबवीत आहेत.. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील मंद्रूप व माळकवठे हे गाव मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी  दत्तक घेतले होते. याच पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या लोकांची बैठक घेऊन ऑपरेशन परिवर्तनाचे  मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांनी सूचना दिल्या.

COMMENTS