अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरामध्ये शिव प्रहार संघटनेच्यावतीने 26 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या भगवा मेळावा आयोजित कार्यक्रमात ख्रिश्चन समा
अहमदनगर (प्रतिनिधी)-
श्रीरामपूर शहरामध्ये शिव प्रहार संघटनेच्यावतीने 26 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या भगवा मेळावा आयोजित कार्यक्रमात ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केल्याबद्दल अहमदनगर शहर व तालुक्यातील ख्रिश्चन संघटना संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली
यावेळी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सावन वाघमारे, युवा जिल्हाध्यक्ष विजय शिरसाट, उपाध्यक्ष सुनीत ढगे, समन्वयक मार्टिन पारधे, पास्टर रवी चांदेकर, सामाजिक कार्यकर्ते विनीत मकासरे, किरण पवार, अभी पंडित, सुनील बनसोडे, संदीप वाघमारे आदीसह समाज बांधव उपस्थित होते.
श्रीरामपूर येथे 26 सप्टेंबर रोजी शिव प्रहार संघटनेच्यावतीने भगवा मेळावा दिन साजरा करण्यात आला होता संपूर्ण देशात व राज्यात कोरोना महामारी चालू असताना विनापरवाना अंदाजे दोन ते तीन हजार युवकांची गर्दी करून शहरात ख्रिश्चन समाज व मुस्लिम समाजाबद्दल धार्मिक भावना दुखावणारे व समाजात तेढ निर्माण होणारे वक्तव्य शिव प्रहार संघटनेचे प्रमुख वक्ते तथा निलंबित पोलिस अधिकारी सुरज आगे यांनी केली आहे
सदर कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली त्यामुळे सर्व समाजात तीव्र चीड निर्माण झाली असून सर्व संघटनेच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध सोशल मीडियाद्वारे होत असून आगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे व सदर क्लिप मध्ये गोळ्या मारण्याची भाषा वापरण्यात आली आहे या प्रकरणाची त्वरित चौकशी करून संबंधित चिथावणीखोर भाषण करणाऱ्या सुरज आगे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने करण्यात आली अन्यथा ख्रिश्चन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
COMMENTS