रेमडेसिव्हीर हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही ; तज्ज्ञांचा सल्ला;

Homeमहाराष्ट्र

रेमडेसिव्हीर हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही ; तज्ज्ञांचा सल्ला;

रेमडेसिव्हीर हा कोरोना वरचा रामबाण उपाय नसून गरज नसताना अनेकांना इंजेक्शनसाठी धावपळ करायला लागत असल्याचे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

सामान्य नागरिकांना ‘ विचारतेय ‘ कोण ? 
पी.एचडी फेलोशीप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनावर येणार गदा
भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून 35 हजारांची फसवणूक

पुण/प्रतिनिधीः रेमडेसिव्हीर हा कोरोना वरचा रामबाण उपाय नसून गरज नसताना अनेकांना इंजेक्शनसाठी धावपळ करायला लागत असल्याचे मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. रेमडेसिव्हीर हे कोरोनावर ते काही अंशीच उपयुक्त ठरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 

राज्यात सध्या सगळीकडेच रेमडेसिव्हीरचा तुटवडा आहे. रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी लोकांनी अक्षरशः दुकानाबाहेर रांगा लावलेल्या आहेत. यानंतरही अनेकांना गरजेइतकी  इंजेक्शन्स न घेता परत जाण्याची वेळ येत आहे. दुकानांबाहेर गर्दी होऊन तिथे सामाजिक अंतर भान पाळले जात नाही. रुग्णाचा जीव वाचावा यासाठी धडपडणार्‍या नातेवाइकांना तास न तास रांगेत उभे राहावे लागत आहे. रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन हा कोरोनावरचा रामबाण उपाय नाही. अनेक रुग्णांना ते कारण नसतानाही दिले जात असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. समीर जोग म्हणाले, की रेमडेसिव्हीर हे खरे तर रोगाच्या शोधात असलेले इंजेक्शन आहे. वेगवेगळ्या साथी जेव्हा आल्या, तेव्हा तेव्हा ते वापरून पाहिले गेले. कोरोनावर ते काही अंशी परिणाम करत असल्याच सुरुवातीला वाटले; पण आता जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यास करून निष्कर्ष काढला, की रेमडेसिव्हीर हे लाईफ सेविंग ड्रग नाही. या इंजेक्शनमुळे लक्षणांची तीव्रता कमी होते. कोणतेही औषध चाचण्यांवर ते उतरलेले नाही. अभ्यासाने हे सिद्ध झाले, की मोर्टलिटीवर रेमडेसिव्हिरचा काहीच परिणाम होत नाही. हल्ली डॉक्टरांपेक्षा रुग्णाच्या नातेवाइकांकडूनच रेमडेसिव्हीरचा आग्रह धरला जात आहे. राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, की रेमडेसिव्हीरचा  वापर मध्यम स्वरूपच्या इन्फेक्शनमध्ये होतो. सौम्य रुग्णांमध्ये ते वापरले जात नाही. मध्यम स्वरूपच्या निमोनियामध्ये त्याचा वापर होतो. रुग्ण गंभीर झाल्यावर मात्र त्याचा वापर करून फायदा नसतो; मात्र सध्या रुग्णांना जास्त त्रास होऊ नये, म्हणून काही प्रमाणात डॉक्टर रेमडेसिव्हीर वापरताना दिसतात. 

COMMENTS