नाशिक चोरीःपोलीसांनी दोन तासात दोघांच्या बांधल्या मुसक्या

Homeताज्या बातम्यानाशिक

नाशिक चोरीःपोलीसांनी दोन तासात दोघांच्या बांधल्या मुसक्या

नासिकरोड (प्रतिनिधी):- नाशिक सहकारी साखर कारखान्यात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यास काही तासात नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले अ

दारू पिऊन 50 वर्षीय महिलेसोबत रुग्णालयात केलं अश्लील वर्तन | LOKNews24
आग्रा किल्ल्यात प्रथमच शिवजयंतीचा उत्सव
अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या

नासिकरोड (प्रतिनिधी):- नाशिक सहकारी साखर कारखान्यात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यास काही तासात नाशिकरोड पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.   

      याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे. याचा गैरफायदा घेऊन सोनू उर्फ अनिल माणिक शिंदे व (वय१९) राहणार वडारवाडी झोपडपट्टी, व बंटी उर्फ रोहन आनंदा गायकवाड (वय २०) साईनाथ नगर, नांदुर नाका यांनी बंद असलेला साखर कारखान्यातील सबमर्सिबल पंप व पाणी ओढण्याची मोटर हा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी योगेश सोमनाथ नागरे यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरी झाल्या बाबत फिर्याद दाखल केली होती. चोरीचा तपास सुरू  असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार राजेश साबळे यांना गुप्त माहिती  द्वारे समजले की दोन चोरटे रिक्षा सह सायट्रिक कंपनी परिसरात येणार आहे.  माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, पोलीस नाईक अविनाश देवरे, अविनाश शिंदे, महेंद्र जाधव, योगेश वाजे, विशाल कुवर, समाधान वाजे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे पोलीस निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी दोन चोरटे रिक्षातुन चोरी केलेला माल घेऊन जात असताना पोलिस त्याना ताब्यात घेण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून चोरलेले साहित्य व चोरीत वापरलेली रिक्षा असा एकूण दोन लाख, तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासात या चोरीचा तपास कौशल्यपूर्ण केल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे

COMMENTS