Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Solapur : वाळू तस्कराने चिरडलेल्या पोलिसावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातील वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारलयाची घटना घडली आहे. यामुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.

Solapur : वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह तब्बल ३६ तासाने सापडला (Video)
पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्याला टेम्पोनी दिली जोराची धडक l LokNews24
Madha : उजनी धरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सोलापूर जिल्हातील मंगळवेढा तालुक्यातील वाळू माफियांनी पोलीस कर्मचाऱ्याला चिरडून ठार मारलयाची घटना घडली आहे. यामुळे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. पोलिस काॅनसटेबल गणेश प्रभू सोलंनकर हे बुरलेवाडी तालुका सांगोला येथील असून ते मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत होते. ते शनिवारी सकाळी 9 च्या दरम्यान शासकीय कामानिमित्त गोणेवाडी ते शिरशी या रस्त्यावर हॉटसन दूध डेअरी समोर थांबले होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाने न थांबता सोलंनकर यांच्या अंगावर घालून चिरडले. चालक रणजित सुडके फरार झाला होता. नागरिकांनी त्यांना मंगळवेढ्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले.गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिमतराव जाधव यांनी हाॅसपिटलात भेट दिली. काही तासातच आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर मयत पोलीस कॉन्स्टेबल गणेश यांचा मृत्यू त्यांच्या घरी नेवून त्यांच्यावर शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी मानवंदना दिली. याप्रसंगी आमदार शहाजी पाटील, भाऊसाहेब रुपनर, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, सुहास जगताप, पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS