Aaurngabad : औरंगाबाद शहरात हिंदू दलित महासंघाची चर्चासत्र व बैठक संपन्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Aaurngabad : औरंगाबाद शहरात हिंदू दलित महासंघाची चर्चासत्र व बैठक संपन्न

आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यकारिणीची निवड यशोदीप हॉटेल येथील सभागृहात हिंदू दलित महासंघाची बैठक संपन्न  अनुसू

संभाजीनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24
औरंगाबादेत दोन चारचाकी वाहनांचा अपघातात चार जणांचा मृत्यू  

आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय कार्यकारिणीची निवड

यशोदीप हॉटेल येथील सभागृहात हिंदू दलित महासंघाची बैठक संपन्न 

अनुसूचित जातीतील मातंग, चर्मकार, वाल्मिकी-सुदर्शन, खाटीक व मादगी या समाजाच्या विकासाचा समतोल राखण्यासाठी, त्यांना सामाजिक न्यायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व सांस्कृतिक विकास साधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिंदू दलित महासंघाची बैठक व चर्चासत्र औरंगाबाद शहरातील यशोदीप हॉटेल येथील सभागृहात हिंदू दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष  नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

  या बैठकीत औरंगाबाद विभागीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये हिरालाल गतखणे यांची चर्मकार समाजाच्या विभागीय समनव्यक पदी, माजी नगरसेवक राजू आहिरे यांची मातंग समाजाच्या विभागीय समनव्यक पदी, विजेंद्र टाक यांची वाल्मिकी-सुदर्शन समाजाच्या विभागीय समनव्यक पदी, छगनराव पराडे यांची खाटीक समाजाच्या समनव्यक पदी, संदीप मानकर यांची विभागीय संघटक समनव्य पदी, यांसोबतच रामराज गचांडे, डॉ.भारत नांदूरे, कारभारी लोखंडे, विजय गोतरकर, राकेश बिडलान आदींची देखील नवीन कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली.

याप्रसंगी व्यासपीठावर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे समवेत आदी उपस्थित होते

COMMENTS