Homeक्रीडा

राष्ट्रकुल स्पर्धेत नाशिकच्या सर्वेश कुशारेला रौप्यपदक

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने दमदार कामगिरी करत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात ऐतिहासिक रौप्य पदकाची

विराज पिसळची सुवर्णपदक कामगिरी; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन : संधान
पाणी पुरवठ्याबाबत प्रशासनाकडून कराडकरांसह लोकप्रतिनिधींची दिशाभूल
Commonwealth Games 2026: सर्वेश कुशारे ने रचा इतिहास, लॉन्ग जंप में सिल्वर मेडल जीतने वाले पहले भारतीय बने - News18 हिंदी


ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या उंच उडीपटू सर्वेश कुशारे याने दमदार कामगिरी करत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात ऐतिहासिक रौप्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेतील मैदानी क्रीडा प्रकारात भारताच्या पदकांची सुरुवात सर्वेशच्या उल्लेखनीय कामगिरीने झाली. नाशिकच्या या खेळाडूने सातत्यपूर्ण आणि आत्मविश्‍वासपूर्ण खेळाचे दर्शन घडवत भारताच्या क्रीडा इतिहासात आणखी एक मानाचा अध्याय जोडला.
31 वर्षीय सर्वेशने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच प्रभावी कामगिरी केली. त्याने 2.05 मीटर, 2.10 मीटर, 2.15 मीटर आणि 2.20 मीटर या सर्व उंची पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पार केल्या. त्यानंतर 2.25 मीटर उंची तिसर्‍या प्रयत्नात पार करत त्याने रौप्य पदक जवळपास निश्‍चित केले. जमैकाच्या रोमेन बेकफोर्ड यानेही 2.25 मीटर उंची गाठली; मात्र त्याने ही उंची पहिल्याच प्रयत्नात पार केल्यामुळे त्याला सुवर्ण पदक मिळाले. त्यानंतर 2.28 मीटर उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न दोन्ही खेळाडूंना अपयशी ठरले. इंग्लंडच्या किमानी जॅक याने 2.20 मीटर उंचीची यशस्वी उडी मारत कांस्य पदक पटकावले. सर्वेश कुशारे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहे. जून महिन्यात भुवनेश्‍वर येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराज्यीय मैदानी क्रीडा स्पर्धेत त्याने 2.31 मीटर उंच उडी मारून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता. त्याआधी जागतिक मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पुरुषांच्या उंच उडीच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय खेळाडू ठरत त्याने इतिहास घडविला होता. त्या स्पर्धेत त्याने सहावे स्थान मिळवले होते.
या अंतिम फेरीत भारताचे तीन खेळाडू सहभागी झाले होते. मात्र प्रारंभीची 2.05 मीटर उंची पार करण्यात अपयशी ठरल्यानंतर तेजस्विन शंकर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. तरीही त्याने संपूर्ण स्पर्धेदरम्यान मैदानाबाहेरून सर्वेशला उत्साहाने प्रोत्साहन दिले. भारताचा आणखी एक खेळाडू जे. आदर्श राम यानेही अंतिम फेरीत सहभाग नोंदविला. सर्वेश कुशारेच्या या ऐतिहासिक रौप्य पदकामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मैदानी क्रीडा प्रकारात भारताचे पदकांचे खाते उघडले आहे. या यशामुळे भारतीय चमूचा आत्मविश्‍वास उंचावला असून, पुढील स्पर्धांमध्ये आणखी पदकांची अपेक्षा बळावली आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या या खेळाडूने आपल्या सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला आहे.
भारतची 10 पदकांसह आठव्या स्थानावर झेप
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पॅरा-अ‍ॅथलेटिक्स आणि अ‍ॅथलेटिक्समध्ये एकाच वेळी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके जिंकून आपली छाप पाडली. या खेळाडूंनी पदकांवर आपले नाव कोरून इतिहास रचला आणि भारताचा झेंडा फडकवला. भारताने सोमवारी सहा पदके जिंकली, ज्यामुळे दोन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह त्यांची एकूण पदकसंख्या 10 झाली आहे. भारत सध्या पदक तालिकेत आठव्या स्थानावर आहे.

COMMENTS