वेब टीम : कोलकातापश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध
वेब टीम : कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले खासदार बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाबुल सुप्रियो यांनी दिवसांपूर्वीच भाजपाचा राजीनामा दिला होता.
खासदार अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत बाबुल सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. बाबुल सुप्रियो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने एक निवेदन जारी केले
‘टीएमसीचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार बाबुल सुप्रियो यांचा टीएमसीत प्रवेश झाला आहे.
सुप्रियो यांचे तृणमूल काँग्रेसमध्ये स्वागत. जुलै महिन्यात माजी केंद्रीय मंत्री आणि बंगाल भाजपातील बडे नेते बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचे जाहीर केले होते. राजकारणात केवळ समाजसेवेसाठी आलो होतो आणि मार्ग बदलत आहे अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली होती.’
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ‘मी नेहमी भाजपाचा भाग आहे आणि यापुढील राहील’ असे बाबुल सुप्रियो म्हणाले होते. मी तृणमूलमध्ये सहभागी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
परंतु आता बाबुल सुप्रिया यांनी पोस्ट ‘अपडेट’ करत ती लाईन हटवली आहे. अवघ्या दीड महिन्यात बाबुल सुप्रियो यांनी टीएमसीचा झेंडा हाती घेत भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
COMMENTS