हाडे मजबूत करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ फळांचा समावेश करा!

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

हाडे मजबूत करण्यासाठी आहारामध्ये ‘या’ फळांचा समावेश करा!

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असण

अग्निपथ योजनेंतर्गतच सर्व भरती होणार : अनिल पुरी
पापडासाठी लग्नात भिडले वऱ्हाडी
वर्धा जिल्ह्यात सर्प दंशाने सर्पमित्राचा मृत्यू

आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे मजबूत होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा

संत्री –संत्रीचा आपल्या आहारात सेवन करणे महत्त्वाचे आहे . संत्रीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणात असते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस देखील संत्र्याचा रस नियमित सेवनाने टाळता येतो.त्यामुळे संत्री खाणे महत्वाचे आहे . 

केळी – केळी पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी ओळखली जाते. या व्यतिरिक्त, हे मॅग्नेशियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. हाड आणि दातांच्या संरचनेच्या विकासात पोषक घटक महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे रोज एक केळी खाल्ल्याने हाडे कमकुवत होण्याची समस्या दूर राहते. 

अननस – अननस हि  पोटॅशियमचे स्त्रोत आहे जे शरीरातील हे व्हिटॅमिन ए चा एक चांगला स्त्रोत देखील आहे. यामुळे आपण आहारामध्ये दररोज अननस घेतले पाहिजे.

स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीचे अनेक आरोग्य फायदे आहेत. ते कॅल्शियम, मॅंगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. जे हाडांची रचना तयार करण्यास मदत करतात.

पपई – पपई  फळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.  हे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करते. त्यामुळे संधिवाताचा व हाडांच्या समस्या दूर होतात . 

किवी – किवीमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते. हे मजबूत हाडे, दातांची रचना विकसित करण्यास मदत करते आणि ऑस्टियोपोरोसिस टाळते.

पालक – हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम भरपूर असते. हे हाडे आणि दात यांच्या विकासास मदत करू शकते. एक कप शिजवलेले पालक शरीराला त्याच्या दैनंदिन कॅल्शियमच्या 25 टक्के गरज पुरवू शकते. व्हिटॅमिन ए आणि लोह देखील फायबर समृद्ध पालक असते.

COMMENTS