Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरधाममधील कामगारांना मनपाच्या सेवेत नोकरी द्या

अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केली आहे.

अळसुंदे विद्यालयात वृक्षाबंधन व वृक्षदत्तक कार्यक्रम
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दारू खरेदीसाठी उडाली धावपळ! पहा सुपरफास्ट २४ | LokNews24
नवीन तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव तयार करा

अहमदनगर/प्रतिनिधी- अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांना जाधव यांनी निवेदन दिले आहे. 

त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे जीव जात आ

हेत. जीव गेलेल्या मृतदेहाजवळ वा त्याला पाहण्यासाठी घरातील नातेवाईक देखील बघण्यास येत नाहीत. अशा स्थितीत महापालिकेच्यावतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात, ही चांगली बाब आहे. तसेच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवले आहेत, ते कामगार आपल्या जीवांची पर्वा न करता अतिशय चोख पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे त्या कामगारांना कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आपल्या महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी शासनाकडे शिफ़ारस करावी तसेच त्यांचा विमा काढावा, अशी मागणी जाधव यांनी यात केली आहे.

COMMENTS