दिल्ली-मुंबई प्रवास होणार सुस्साट; नितीन गडकरी यांनी केली दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिल्ली-मुंबई प्रवास होणार सुस्साट; नितीन गडकरी यांनी केली दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची पाहणी

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम प्रगतीपथावर असून, या महामार्गामुळे प्रवास सोपा होणार असून, या महामार्गाची पाहणी गुरूवारी केंद्रीय रस्ते

जवळवाडीच्या महिला सरपंचाकडून अवैध दारू विक्री करणार्‍यावर झडप
कासट,मानधने चांडक यांची जिल्हा माहेश्वरी सभेवर वर्णी
विद्युत भवनात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

नवी दिल्ली : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे काम प्रगतीपथावर असून, या महामार्गामुळे प्रवास सोपा होणार असून, या महामार्गाची पाहणी गुरूवारी केंद्रीय रस्ते, महामार्ग वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. हरियाणा राज्यातून 160 किमीचा रोड जात आहे. यापैकी 130 किमी रस्त्याच्या काम झाले असून हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राला या रस्त्याने जोडले जाणार आहे. या महामार्गामुळे दिल्ली-मुंबई हा प्रवास केवळ 12 तासांत करणे शक्य होणार आहे.
या महामार्गामुळे चारही राज्यांमध्ये आर्थिक समृध्दी व विकासाचे दरवाजे खुले होणार आहेत. या प्रवासासाठी सध्या 1450 किमी अंतर कापावे लागते. परंतु, एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर 1250 किमी होणार आहे. त्यामुळे सध्या 24 तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वे मुळे 12 तासांवर येणार आहे. गडकरींनीही या प्रकल्पाला उल्लेख करताना जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे असे म्हटले आहे.
माध्यमांशी बोलतांना गडकरी म्हणाले की, ’2023-24 पर्यंत 30 हजार कोटी रुपये खर्च करून सुमारे 2500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या योजना राजस्थानमध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.’ ’दिल्ली-कटरा एक्स्प्रेस वे दोन वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे या दोन ठिकाणांतले अंतर 727 किलोमीटर्सवरून 572 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे दिल्लीतून कटराला सहा तासांमध्ये पोहोचता येणार आहे. तसंच, हे अंतर दोन तासांवर येण्यासाठी दिल्ली-चंडीगड, दिल्ली-डेहराडून आणि दिल्ली-हरिद्वार अशा काही नव्या रस्त्यांवरही काम करतो आहोत,’ असे गडकरी यावेळी म्हणाले.

देशात नवी हॉर्न सिस्टीम लागू करण्याबद्दलही गडकरी यांनी माहिती दिली. त्यामुळे आता कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नपासून मुक्ती मिळणार असून, बासरी, सारंगी आदींच्या आवाजातल्या हॉर्नचा वापर केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाआधी नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती देणारं एक ट्विट केलं होतं. ’दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दोन दिवसांच्या पाहणी कार्यक्रमांतर्गत आज हरियाणात सोहना येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह यांच्यासह एक्स्प्रेस वेची पाहणी केली. या योजनेअंतर्गत हरियाणामध्ये एकूण 160 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची निर्मिती होणार असून, त्यापैकी 130 किलोमीटरचं काम देऊन झालं आहे. हरियाणा राज्याला राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राशी जोडून हा एक्स्प्रेस वे राज्यात आर्थिक समृद्धी आणि विकास घेऊन येईल,’ असं त्यांनी म्हटले आहे.

दिल्ली-मुंबई 1380 किमीचा सर्वात मोठा एक्सप्रेस वे
दिल्ली-मुंबई या एक्स्प्रेसवेसाठी 98 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दिल्ली-मुंबई हा 1380 किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे देशातला सर्वांत जास्त अंतराचा एक्स्प्रेसवे ठरेल. नावाप्रमाणेच हा एक्स्प्रेस वे दिल्ली आणि मुंबई या शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून हा महामार्ग मुंबईत येईल. त्यामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चितोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत असे इकॉनॉमिक हब्स एकमेकांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जातील.

COMMENTS