कुशल नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दि १४ रोजी भेट घेऊन कर्जत आण
कुशल नेतृत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आ. रोहित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची दि १४ रोजी भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी व आर्थिक सुबत्तेबाबत चर्चा केली. कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आमदार रोहित यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.सोबतच मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची असलेली संख्या कमी आहे त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आला घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. केंद्राच्या अखत्यारीत असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी आ. रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन विनंती केली.
तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणी व कर्जत, जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना आ. रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे केली.
COMMENTS