वारकऱ्यांना विठ्ठल पावणार… राज्य सरकार देणार ‘इतके’ मानधन…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वारकऱ्यांना विठ्ठल पावणार… राज्य सरकार देणार ‘इतके’ मानधन…

प्रतिनिधी : मुंबई संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककल

‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ पाळणार : पंतप्रधान
सात वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून खून; नराधमाला अटक
धारूर घाटात ट्रकचा अपघात

प्रतिनिधी : मुंबई

संतपीठ बैठकीच्या अनुषंगाने वारकरी सपंद्रायाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचले आहेत. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात ५ हजार रुपये मदत करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होत असून राज्यातील कलाकार आणि वारकरी संप्रदाय वर्गाची नोंद घेण्यात येईल. 

राज्यातील वृद्ध कलावंतांना देण्यात येणाऱ्या मानधनातही वाढ करण्यात येईल, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

कोरोना काळामध्ये अडचणीत सापडलेल्या प्रत्येक वारकऱ्याला सरकार महिन्याला पाच हजार रुपये मानधन देईल. 

सांस्कृतिक कार्य आणि वारकरी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संतपीठ संदर्भात विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीत हा निर्णय घोषित करण्यात आला. 

ज्येष्ठ कलावंतांच्या मानधनात वाढ व्हावी आणि राज्यात भव्य संतपीठ उभारावे, या प्रमुख मागण्या वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी बैठकीत मांडल्या होत्या.

वारकरी संप्रदायाने शासनाकडे केलेल्या मागण्या मान्य असून या संप्रदायाकडे लक्ष देणे, त्यांची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे. 

आजच्या या बैठकीच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे, असे देशमुख म्हणालेत.

COMMENTS