Homeताज्या बातम्याबीड

जनगणना 2026 मध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवावा; ही सामाजिक जबाबदारी – शेख युनूस

देशाच्या विकासाचा पाया मानल्या जाणार्‍या जनगणना 2026 चे काम लवकरच सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी

पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक
’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक
घरात भरधाव डंपर घुसलाविवाहिता गंभीर; राहुरीतील घटना; घराचे मोठे नुकसान



देशाच्या विकासाचा पाया मानल्या जाणार्‍या जनगणना 2026 चे काम लवकरच सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शेख युनूस यांनी नागरिकांना जनगणनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.
ऑनलाईन माहिती भरता न येणार्‍या नागरिकांनी 16 मे 2026 ते 24 जून 2026 या कालावधीत घरी येणार्‍या जनगणना कर्मचार्‍यांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. ही जनगणना देशाच्या तसेच प्रत्येक कुटुंबाच्या भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. जनगणना ही केवळ सरकारची गरज नसून प्रत्येक कुटुंबाच्या भविष्याची जबाबदारी आहे. आपल्या गावात किती शाळा हव्यात, दवाखाने कुठे उभारायचे, रेशनची आवश्यकता किती आहे, यासारखे अनेक निर्णय जनगणनेतील आकडेवारीवर आधारित असतात. त्यामुळे घरी येणार्‍या कर्मचार्‍यांना खरी व संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन शेख युनूस यांनी केले. तसेच, उशर्पीीी -लीं 1948 नुसार नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णतः गोपनीय ठेवली जाते. ही माहिती कोणत्याही शासकीय विभागाला, पोलीस किंवा न्यायालयाला पुरावा म्हणून वापरता येत नाही. त्यामुळे नाव, वय, शिक्षण, व्यवसाय, घराची स्थिती याबाबत कोणतीही भीती न बाळगता खरी माहिती द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. माहिती लपवणे किंवा खोटी माहिती देणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत, एका व्यक्तीची नोंदणी राहिल्यास त्या कुटुंबासह संपूर्ण गावाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. केवळ 10 मिनिटे देऊन आपण पुढील 10 वर्षांचा विकास निश्चित करू शकतो, असेही शेख युनूस यांनी म्हटले.

COMMENTS