प्रतिनिधी : पुणेकोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून सरकारचं उद्योग चालले आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, विरोधकांची कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, प
प्रतिनिधी : पुणे
कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून सरकारचं उद्योग चालले आहे. मोर्चे नाही, आंदोलने नाहीत, विरोधकांची कोणतीही झंझट नाही. दुकाने चालवा, पैसे कमवा, सर्व ठीक चाललं सरकारचं, असं सांगतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले आहे.
दहीहंडीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्यावर मनसे ठाम असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी आज पुण्यात थेट पत्रकार परिषदेत केली.
यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. सरकारमध्ये असलेल्या पक्षांचे कार्यक्रम, मेळावे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिथे लोकांची कार्यकर्त्यांची गर्दी चालते.
या सरकारला फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला लोकांची गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांसाठी समान हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची गर्दी चालणार.
फक्त गणेशोत्सवाला नको. हे कुठले नियम?, असा प्रश्न उपस्थित करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळ ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचं लसीकरण झालं नाही. पुनावालांचंही स्टेटमेंट आहे. पण लसीकरण पूर्ण झालं नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असंही ते म्हणाले.
COMMENTS