श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करा : उद्योगमंत्र्यांकडे मागणी

Homeअहमदनगरराजकारण

श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करा : उद्योगमंत्र्यांकडे मागणी

श्रीगोंदा (प्रतिनिधी) -श्रीगोंदा तालुक्यात औद्योगिक वसाहत लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने दि.3 सप्टेंबर रोजी सोनई येथे शिवसेना पद

नगर शहर सहकारी बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका थांबल्या
उद्यापासून कोपरगाव शहरातील सर्व व्यवहार होणार सुरू-नगराध्यक्ष वहाडणे
कुंभात कोरोनाचा स्फोट , टॉपचे साधू संत कोरोनाच्या विळख्यात | ‘१२च्या १२बातम्या’ | Lok news24

श्रीगोंदा (प्रतिनिधी) –
श्रीगोंदा तालुक्यात औद्योगिक वसाहत लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने दि.3 सप्टेंबर रोजी सोनई येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवेदनाद्वारे राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना ज्येष्ठ नेते नामदार सुभाष देसाई यांच्याकडे केली .

निवेदनात म्हटले आहे की मुंबई , पुणे , पाठोपाठ लगतच्या शिरूर, पारनेर , नगर , राहुरी तसेच दौंड या भागात औद्योगिक वसाहत उभी राहिली परंतु श्रीगोंदा , कर्जत , जामखेड या पट्यामध्ये औद्योगिक वसाहत नसल्याने येथील बेरोजगार तरुणांना शेजारच्या औद्योगिक वसाहती मधे जावे लागले श्रीगोंदा तालुक्यात पाणी , वीज , रेल्वेमार्ग , हायवे आदी सुविधा असताना औद्योगिक वसाहत मात्र होऊ शकली नाही

औद्योगिक वसाहती चे गाजर यापूर्वीच्या आमदारांनी जनतेला वेळोवेळी दाखवून निवडणुका जिंकल्या परंतु औद्योगिक वसाहती चे आश्वासन पूर्ण झाले नाही तरी आपण औद्योगिक वसाहत ची गरज लक्षात घेता लवकरात लवकर औद्योगिक वसाहत श्रीगोंदा तालुक्यात होण्यासाठी मार्ग काढावा आशी मागणी दुतारे यांनी केली आहे

यावेळी राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख , संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हाप्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे आदि उपस्थित होते. या बैठकीसाठी तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख व युवासेना तालुकाप्रमुख निलेश गोरे उपस्थित होते .

नामदार सुभाष देसाई यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकार औद्योगिक वसाहत होण्यासाठी लवकरच निर्णय घेईल असे आश्वासन दिले शासन पातळीवर याबाबत तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले

COMMENTS