मुंबई: सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धा
मुंबई: सद्य परिस्थितीत महाराष्ट्रात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत होत असलेली किंचित वाढ चिता वाढवणारी आहे. ही वाढ अधिक तीव्र होऊन ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी शक्यता आणि भीती वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ही संभाव्य तिसरी लाट प्रभावहीन ठरावी किवा तिची तीव्रता कमी रहावी यासाठी सर्व संबधित यंत्रणांनी सजग राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात शिवाय नागरिकांनीही यासंबंधाने असलेल्या सर्व मार्गदर्शनपर सुचनांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.
मागच्या काही दिवसात भारतातील एकूण कोविड – १९ बाधीत रूग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले असून यात केरळ सारख्या राज्यातील वाढ लक्षणीय आहे. या संदर्भाने मंत्री अमित देशमुख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यात हळूहळू कोरोना बाधित रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आगामी काही दिवसात ही रूग्णसंख्या अधिक गतीने वाढून ती तिसऱ्या लाटेचे रूप धारण करेल अशी भिती तज्ज्ञ मंडळी व्यक्त करीत आहेत. या सर्व तत्ज्ञमंडळीचा हा इशारा लक्षात घेता लातूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण राज्यातीलच प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जनतेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. त्याच बरोबर या संदर्भाने लागू असलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
COMMENTS