Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे आ.अमोल खताळ यांच्या हस्ते महापूजा

पाथर्डी  : संगमनेर विधानसभा मतदार सघांचे आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी वासंतिक नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे श्री मोहटादे

तृतीयपंथीयांकडून यल्लमादेवीचा भक्तिमय जागर; जगातील युद्धसंकट दूर करण्यासाठी देवीचरणी प्रार्थना
अकोले बाजार समितीच्या कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केट सूरू शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद
खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी

पाथर्डी  : संगमनेर विधानसभा मतदार सघांचे आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी वासंतिक नवरात्र महोत्सवा निमित्त श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे श्री मोहटादेवीचे दर्शन घेवून महापूजा केली. श्री मोहटादेवीचे भव्य मंदिर, भाविकांसाठी उपलब्ध सोयी सुविधा, देवस्थान समितीकडून विकास कामांबरोबरच भाविकांसाठी दैनंदिन सुविधा देण्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याने भाविकांचेही समाधान होते. येथील स्थान महात्म्य मोठे असल्याने येणाऱ्या भाविकाला हमखास प्रचिती येते. मंदिर परिसर स्वच्छता खुप सुंदर असल्याचे यावेळी आ.खताळ यांनी सांगितले. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले, कर्मचारी भाविक उपस्थित होते.

COMMENTS