Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घळाटवाडी मारहाण प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करा-अ‍ॅड.सुभाष राऊत मेंढपाळांसह ओबीसी समाजावरील हल्ले कदापी सहन करणार नाहीत; समता परिषदेचा इशा

बीड : माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील आरोपींना त

मुद्रा मोदी से मुजराच्या घोषणांनी नेकनूर दणाणले मोदी हटाव, देश बचाव म्हणत वंचित बहुजन आघाडीचा रस्ता रोको
तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला,पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद
शिक्षण अधिकार्‍यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडलीसेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड

बीड : माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. ओबीसी नेते तथा समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी बोलताना अ‍ॅड. सुभाष राऊत म्हणाले की, राज्यात वारंवार मेंढपाळांसह ओबीसी समाजावर हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत असताना आम्ही शांत बसणार नाही. समाजबांधवांनी अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अ‍ॅड. सुभाष राऊत यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा धनगर समाजासह ओबीसी समाजाच्या वतीने माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. संदीप बेदरे, पांचाळ समाज सोनार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पंडित, समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, युवा नेते नितीन राऊत, धनंजय काळे यांच्यासह धनगर समाज व ओबीसी समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.

COMMENTS