Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढेवडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी वाबळे; नाशिकहून मित्रपरिवार श्रीगोंद्यात

नागवडे कारखान्यात सत्कार समारंभ श्रीगोंदा : तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था मानल्या जाणाऱ्या मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बापूसाहेब वाबळे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचा सत्कार करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यातील मित्रपरिवाराने श्रीगोंद्यात येऊन केलेल्या विशेष सत्कारामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.  वाबळे यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून त्या माध्यमातून ते राज्यातील विविध जिल्ह्यांत कृषी प्रदर्शनांचे आयोजन करतात. त्यामुळे राज्यभर त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला आहे. त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीची माहिती सोशल मीडियावरून समजताच नाशिक जिल्ह्यातील त्यांचे घनिष्ठ मित्र थेट श्रीगोंद्यात येऊन त्यांच्या सन्मानासाठी उपस्थित राहिले.  या पार्श्वभूमीवर नागवडे साखर कारखान्यात चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते चेअरमन बापूसाहेब वाबळे व व्हाइस चेअरमन दत्तात्रय झुंजुरुक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नाशिक जिल्हा परिषदेचे गटनेते तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वाल्मिक वानखेडे, राजेंद्र ठाकरे, पुंडलिक गुंजाळ, रविंद्र ठाकरे, विजय कुंभार्डे, बाबुराव कुंभार्डे, रावसाहेब गांगुर्डे, श्रीहरी ठाकरे, दिगंबर वाघ, सिताराम मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले, “एवढ्या दूरवरून माझ्या कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी आलेली ही मंडळी आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. बापूसाहेब वाबळे हे आमचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी असून त्यांनी मागील पाच वर्षांत संस्थेचा कारभार उत्कृष्टपणे सांभाळत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.”  या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच दत्तात्रय उंडे, माजी चेअरमन प्रकाश उंडे, रावसाहेब जाधव, जयसिंग मांडे, काकासाहेब मांडे, राहुल साळवे, सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, नवनाथ उंडे, लालासाहेब गोरे, बाबासाहेब फापाळे, विश्वास ससाने, हनुमंत जाधव, सुनील उंडे, पोपट कुरुमकर, दीपक वाबळे, हनुमंत वाबळे, नवनाथ शिंदे, लक्ष्मण मांडे, बबन धावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पवार यांनी केले, तर आभार पंडितराव वाबळे यांनी मानले.

शेवगाव तालुक्यातील नागलवाडीमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा; शस्त्रांचा धाक; 55 तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी
बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा; कर्णकर्कश सायलेन्सरवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई

नागवडे कारखान्यात सत्कार समारंभ

श्रीगोंदा : तालुक्यातील महत्त्वाची सहकारी संस्था मानल्या जाणाऱ्या मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बापूसाहेब वाबळे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचा सत्कार करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्यातील मित्रपरिवाराने श्रीगोंद्यात येऊन केलेल्या विशेष सत्कारामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

 वाबळे यांची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी असून त्या माध्यमातून ते राज्यातील विविध जिल्ह्यांत कृषी प्रदर्शनांचे आयोजन करतात. त्यामुळे राज्यभर त्यांचा मोठा मित्रपरिवार तयार झाला आहे. त्यांच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीची माहिती सोशल मीडियावरून समजताच नाशिक जिल्ह्यातील त्यांचे घनिष्ठ मित्र थेट श्रीगोंद्यात येऊन त्यांच्या सन्मानासाठी उपस्थित राहिले.

 या पार्श्वभूमीवर नागवडे साखर कारखान्यात चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते चेअरमन बापूसाहेब वाबळे व व्हाइस चेअरमन दत्तात्रय झुंजुरुक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नाशिक जिल्हा परिषदेचे गटनेते तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वाल्मिक वानखेडे, राजेंद्र ठाकरे, पुंडलिक गुंजाळ, रविंद्र ठाकरे, विजय कुंभार्डे, बाबुराव कुंभार्डे, रावसाहेब गांगुर्डे, श्रीहरी ठाकरे, दिगंबर वाघ, सिताराम मांदळे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नागवडे साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले, “एवढ्या दूरवरून माझ्या कार्यकर्त्याच्या सन्मानासाठी आलेली ही मंडळी आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. बापूसाहेब वाबळे हे आमचे निष्ठावंत व विश्वासू सहकारी असून त्यांनी मागील पाच वर्षांत संस्थेचा कारभार उत्कृष्टपणे सांभाळत संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.”

 या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, सरपंच प्रमोद शिंदे, उपसरपंच दत्तात्रय उंडे, माजी चेअरमन प्रकाश उंडे, रावसाहेब जाधव, जयसिंग मांडे, काकासाहेब मांडे, राहुल साळवे, सचिन उंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, नवनाथ उंडे, लालासाहेब गोरे, बाबासाहेब फापाळे, विश्वास ससाने, हनुमंत जाधव, सुनील उंडे, पोपट कुरुमकर, दीपक वाबळे, हनुमंत वाबळे, नवनाथ शिंदे, लक्ष्मण मांडे, बबन धावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पवार यांनी केले, तर आभार पंडितराव वाबळे यांनी मानले.

COMMENTS