Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा पोलिसांचा पुढाकार; डीजे-फ्लेक्समुक्त यात्रा

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना; नागरिकांकडून कौतुक श्रीगोंदा : तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सामाजिक वातावरण शांततापूर्ण राखण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध उपाययोजना राबवून तालुक्यात शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.  यंदा श्री संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव प्रथमच डीजे व फ्लेक्सबॅनरमुक्त वातावरणात पार पडला. पोलिसांनी उत्सवादरम्यान डीजे व अनावश्यक फ्लेक्सबॅनर यावर निर्बंध घालत पारंपरिक आणि शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर दिला. त्यामुळे यात्रेचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक शिस्तबद्ध आणि अनुशासित राहिल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.  यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणी सतत गस्त घालण्यात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे उत्सव सुरळीत पार पडल्याचे नागरिकांनी सांगितले.  दरम्यान, तालुक्यातील अवैध धंद्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. अवैध गुटखा विक्री, बेकायदेशीर दारू विक्री तसेच इतर अनधिकृत प्रकारांवर पोलिसांनी छापे टाकत कारवाई केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.  पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ व नागरिकांकडून स्वागत होत असून पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू राहावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

किनवट पालिकेचा अजब कारभार!35 लाखांची शववाहिनी धुळखात; नऊ महिन्यांपासून प्रशासनाला पडलाय ’विसर’
शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान
अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना; नागरिकांकडून कौतुक

श्रीगोंदा : तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच सामाजिक वातावरण शांततापूर्ण राखण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकाराचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध उपाययोजना राबवून तालुक्यात शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

 यंदा श्री संत शेख महंमद महाराज यात्रा उत्सव प्रथमच डीजे व फ्लेक्सबॅनरमुक्त वातावरणात पार पडला. पोलिसांनी उत्सवादरम्यान डीजे व अनावश्यक फ्लेक्सबॅनर यावर निर्बंध घालत पारंपरिक आणि शांततापूर्ण पद्धतीने उत्सव साजरा करण्यावर भर दिला. त्यामुळे यात्रेचे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण अधिक शिस्तबद्ध आणि अनुशासित राहिल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.

 यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच विविध ठिकाणी सतत गस्त घालण्यात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांच्या नियोजनबद्ध कामगिरीमुळे उत्सव सुरळीत पार पडल्याचे नागरिकांनी सांगितले.

 दरम्यान, तालुक्यातील अवैध धंद्यांवरही पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. अवैध गुटखा विक्री, बेकायदेशीर दारू विक्री तसेच इतर अनधिकृत प्रकारांवर पोलिसांनी छापे टाकत कारवाई केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

 पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ व नागरिकांकडून स्वागत होत असून पोलिसांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. भविष्यातही अशाच प्रकारे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू राहावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS