Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जातीय द्वेषातून अपमानकारक वागणूक देणार्‍या शाळेवर कारवाईची मागणी

पालकांची समाजकल्याण आयुक्तांकडे तक्रारबीड । प्रतिनिधीतालुक्यातील नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या सचिव, पदाधिकारी व कर्मचार्‍यांकडून जात

केजमध्ये जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव उत्साहात संपन्न; मान्यवरांची मांदियाळी
Beed : बीड जिल्ह्यासह केज तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी (Video)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संसदरत्न खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पालकांची समाजकल्याण आयुक्तांकडे तक्रार
बीड । प्रतिनिधी
तालुक्यातील नेकनूर येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या सचिव, पदाधिकारी व कर्मचार्‍यांकडून जातीय द्वेषातून चिमुकल्या विद्यार्थिनी व तिच्या पालकांना अपमानकारक वागणूक देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून संबंधित शाळेवर ट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थिनीचे पालक अमित निर्मळ यांनी समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, दिनांक 15 ऑगस्ट रोजी शाळेत स्वातंत्र्यदिन कार्यक्रमानिमित्त विविध महापुरुषांचे फोटो मंचावर लावण्यात आले होते. मात्र, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का लावण्यात आला नाही, असा प्रश्न संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी उपस्थित केला होता. याच कारणाचा राग मनात धरून शाळेचे सचिव, अध्यक्ष, पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी विद्यार्थिनी व तिच्या पालकांना त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थिनीचा प्रवेश झालेला असतानाही वारंवार पैशांची मागणी करणे, स्कूल बसमध्ये बसण्यास नकार देणे, पालकांशी अरेरावीची भाषा वापरणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित कार्यालयांकडे वेळोवेळी तक्रारी व निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे जातीय द्वेषातून अपमानकारक वागणूक देणार्‍या संबंधित शाळेचे वरिष्ठ शिक्षक, बस चालक तसेच अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकार्‍यांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अमित निर्मळ यांनी समाजकल्याण आयुक्तांकडे केली आहे.

COMMENTS