राणेंचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणेंचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र

रशियन लष्करी विमान कोसळले 65 जणांचा मृत्यू
वाहन-गृह कर्ज पुन्हा महागले
पीएच.डी.चा प्रबंध मान्य करण्यासाठी 25 हजाराची लाच

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नारायण राणे यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. 

दरम्यान रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोठ्या फौजफाट्यासह सध्या राणे थांबलेल्या असलेल्या संगमेश्वर इथे पोहचले आहेत. याच ठिकाणी रत्नागिरी पोलीस त्यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांच्या ताब्यात देतील अशी शक्यता आहे. नाशिक पोलीस पुढील अटकेची कारवाई करतील असे सांगितले जात आहे. रत्नागिरी सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्याने मुंबई हायकोर्टात अर्ज दाखल करून त्यावर काय निर्णय होतो हे आता पाहावे लागणार आहे. 

COMMENTS