Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राणेंच्या वक्तव्याचे नाशकात पडसाद; भाजप कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये

जिल्ह्यात अजून सहा पोलिस ठाणी होऊ शकतात…; प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, राजकीय ताकद लावण्याची गरज
हॅलिकॉप्टर अपघातानंतर भारतीय लष्कराचा जवान 18 दिवसांपासून बेपत्ता l DAINIK LOKMNTHAN
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला खिंडार

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अपशब्द वापरल्याने शिवसैनिकांचा संताप अनावर झाला आहे. नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर दगडफेक करत शिवसैनिकांनी हे कार्यालय फोडले आहे.

जुन्या नाशिकमध्ये भाजपचे वसंत स्मृती हे कार्यालय आहे. आज सकाळी नाशिकमधील शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला.

COMMENTS