Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिवृष्टीने केले नुकसान; त्यात तलाठी भाऊसाहेबाची भर ! मदतीपासून खरे शेतकरी वंचित…

जिल्हाधिकारी साहेब त्या तलाठी पांचग्रे साहेबांची चौकशी करणार का?कडा । प्रतिनिधीतालुक्यातील कडा मंडळांतर्गत येणार्‍या जळगाव सज्जातील शेरी बु,वटनवाड

Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)
विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचे धडे; गेवराईतील आश्रम शाळेत ‘आनंद नगरी’ उत्साहात
जातीय द्वेषातून अपमानकारक वागणूक देणार्‍या शाळेवर कारवाईची मागणी

जिल्हाधिकारी साहेब त्या तलाठी पांचग्रे साहेबांची चौकशी करणार का?
कडा । प्रतिनिधी
तालुक्यातील कडा मंडळांतर्गत येणार्‍या जळगाव सज्जातील शेरी बु,वटनवाडी,जळगाव या ठिकाणी अतिवृष्टी,  गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते.पिकं अक्षरशः पाण्याखाली जाऊन,वर्षभराची मेहनत पाण्याबरोबर वाहून गेले. एक क्षणात होत्याचे नव्हते झाले,मात्र निसर्गाच्या या संकटात कळस गाठला अन त्यात तत्कालीन तलाठी भाऊसाहेबानी केलेल्या अन्यायाची भर पडली.प्रत्यक्षात नुकसान झाले असतानाही अनेक शेतकर्‍यांच्या पंचनाम्यात वस्तुस्थिती ऐवजी ‘अर्थकारण’ दिसून आले. काही ठिकाणी तर ओळख आणि हाताकडे पाहूनच पंचनामे करण्यात आल्याचे गंभीर आरोप श्रीराम सोनवणे यांनी केला आहे. खर्‍या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना डावलून लोकांचे प्रस्ताव पुढे पाठवले गेल्याने संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात तक्रारी करूनही तत्कालीन तलाठी भाऊसाहेब यांनी जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याचे प्रकार समोर येत आहेत.
निसर्गाचा कोप पुरेसा नव्हता का? आता प्रशासनाचाही अन्याय सहन करायचा का?असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहे. शासनाकडून मदतीची अपेक्षा असताना तलाठ्यांनी कागदावरचे पंचनामे करून वास्तव झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे,खरे नुकसानग्रस्त बाजूला ठेवून काही मोजक्यांनाच लाभ देण्याचा प्रकार केल्याचा असा थेट आरोप करत तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी सोनवणे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांनी केली आहे.नुकसान आमचं,पण भरपाई दुसर्‍यांनाच! मग आम्ही दाद मागायची कोणाकडे? असा सवाल उपस्थित करत महसूल प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.
एकच फोटोचा अनेक पंचनाम्यात वापर!
अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावांमध्ये एकाच शेताचा किंवा एकाच शेतकर्‍याचा फोटो वेगवेगळ्या पंचनाम्यांत वापरल्याची गंभीर चर्चा सुरू आहे. एका ठिकाणी तोच फोटो कपाशीचे नुकसान दाखवतो,तर दुसर्‍या ठिकाणी वेगळ्या पिकाचे! या प्रकारामुळे पंचनाम्यांच्या सत्यतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले असून शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.अशा बनावट पंचनाम्यांमुळे खर्‍या नुकसानग्रस्तांना न्याय मिळेल का?असा सवाल उपस्थित होत आहे.वरिष्ठ अधिकार्‍यांनी तातडीने चौकशी करून तत्कालीन तलाठ्यावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी होत आहे.
तहसीलदार यांची भूमिका अस्पष्ट
या संदर्भात तहसीलदार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

COMMENTS