गुन्हा दाखल न झाल्यास करणार पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रारमुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरीमध्ये मधील तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छा
गुन्हा दाखल न झाल्यास करणार पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार
मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरीमध्ये मधील तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक यांनी काही अधिकार्यांना हाताशी धरून संगनमताने कोट्यावधी रूपयांचा अपहार करत शासनाच्या तिजोरीची लूट चालवली आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकार्यांनी तात्काळ दखल घेत फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर, आम्ही थेट पंतप्रधान कार्यालयाकडे याची तक्रार करणार असून यासंदर्भातील पुरावे त्यांना सादर करणार आहोत.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, श्रीमती छाया नाईक यांची भ्रष्टाचार करण्याची पद्धत ठरलेली असून त्यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात हॉल बांधण्यासाठी एक कोटींचा निधी मंजूर केला असतांना छाया नाईक यांनी त्यात विविध आयटम वाढवून हा निधी 1 कोटी 57 लाख करत आपल्या मर्जीतील ठेकेदाराला या निविदा मिळवून देण्यासाठी जो अट्टाहास केला, त्याची संपूर्ण माहिती रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. निर्माण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी श्रीमती नाईक यांनी इतका आटपिटा का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुळातच तत्कालीन अधीक्षक अभियंता श्रीमती छाया नाईक, विद्यमान अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी तिथे आहेत. यासोबतच कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, लेखापाल अनिलकुमार शर्मा, उपअभियंता, सा.बां. उपविभाग क्रमांक 1 रत्नागिरी जनक हरीदास धोत्रेकर, उपअभियंता प्रमोद विठ्ठल भारती, उपअभियंता पूजा राजेंद्र इंगवले, कनिष्ठ अभियंता अ.बी. पवळ कनिष्ठ अभियंता जे.एस.बंडगर, शाखा अभियंता एस.एस. सोळंके, सागर व्ही. तांबे, कनिष्ठ अभियंता एस.आर. देवरे, अ.आर. बोरसे, इ. आर. बामणे, आर.पी. कुलकर्णी, या अधिकार्यांनी संगनमताने कोट्यावधी रूपयांची बोगस बिले काढून शासनाच्या तिजोरीची लूट चालवली आहे.
या अधिकार्यांनी एकमेकांशी संगनमत करून कामे चालू करण्यापूर्वी चाचणी रंध्रे घेणे, पावसाळ्यात पडलेल्या दाखविलेल्या दरडी बाजूला करणे, रस्ते व त्यावर डांबरीकरण करणे, मोर्यांची दुरुस्ती, पावसाळी देखभाल दुरुस्ती कामांशी संबंधित बिले चुकीच्या पद्धतीने मंजूर केली आहेत. श्रीमती छाया नाईक आणि मिलिंद कुलकर्णी यांनी सा. बां. नियमावलीप्रमाणे आणि लेखासंहिताप्रमाणे आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडण्यात निष्काळजीपणा करून भ्रष्टाचार संगनमताने केलेला आहे. तर यासोबतच कार्यकारी अभियंता ओटवणेकर सा. बां. विभाग उत्तर ता. जि. रत्नागिरी येथे आहेत. आर.एस. बोबडे हे कार्यरत होते. त्यांनी ठेकेदारास काम देताना केलेला करारनामा व वर्क ऑर्डर प्रमाणे काम केलेले नसताना त्यांचेकडे आलेल्या बिलांची खातरजमा नियमाप्रमाणे न करता बिलांची रक्कम अदा केली आहे आणि निधीचा गैरवापर केला आहे. विभागीय लेखापाल शर्मा यांनी सा. बां. नियमावली सा. बां. लेखासंहितेचा व ठेकेदाराबरोबर केलेल्या कराराचा भंग करून बिलांचे पेमेंट करण्यासाठी सहकार्य करत आर्थिक अनियमितता करत कोट्यावधी रूपयांची लूट करत शासनाच्या तिजोरीची आणि सर्वसामान्यांच्या पैशांची वारेमाप लूट चालवली आहे.
मुख्य अभियंता राजभोज यांना कारवाईचे वावडे का ?
यासंदर्भात मुख्य अभियंता राजभोष यांच्याकडे दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी तक्रार दाखल असून तब्बल 30 दिवसांनंतरही कारवाई होत नसल्यामुळे राजभोज यांना कारवाईचे वावडे का ? असा आमचा सवाल आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम कोकण विभाग, अधीक्षक अभियंता रत्नागिरी, पोलिस उपाधीक्षक लाचलुचपत उपविभाग रत्नागिरी, राज्यकर उपायुक्त वस्तू व सेवा कर भवन रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दाखल केली, असून याप्रकरणी एफआयआर नोंदवून गुन्हा दाखल करून चौकशी व्हावी, हीच आमची मागणी आहे.
फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी
ठेकेदार 2008 पासून येथे टायपिंगचे काम करत आहे.
ठेकेदार यांचे सुरुवातीला काम देताना केलेले रजिस्टर कार्यालयामध्ये कागदपत्र नाहीत म्हणजे रजिस्ट्रेशन न करता काम द्यायला सुरुवात केली.
सदरची तक्रार पोलीस अधीक्षक ठाणे यांनी प्रलंबित ठेवलेली आहे, त्याबाबत पोलीस महासंचालक अँटी करप्शन वरळी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश द्यावेत.
सा.बां. विभागाचे अप्पर सचिव यांनी या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशीचे आदेश देऊन एफआयआर नोंदवावा. अन्यथा अधिकारी यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार सुरू असून तक्रार दाखल करून घेण्यास कसूर करत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्यामुळे त्यांच्याविरोधात हायकोर्ट आणि फौजदारी गुन्हे दाखल करणार.
अधिकारी पुरावे नष्ट करू शकतात याची लाच लुचपत विभागाने तात्काळ दाखल घ्यावी

COMMENTS