योग्य दिशा, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि संस्थेच्या सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडते- डॉ. आदित्य सारडाबीड । प्रतिनिधीआदित्य श

योग्य दिशा, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि संस्थेच्या सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडते- डॉ. आदित्य सारडा
बीड । प्रतिनिधी
आदित्य शिक्षण संस्थेत विद्यार्थांना पुस्तकी ज्ञानाबरोबर विविध करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. योग्य दिशा, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि संस्थेच्या सकारात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडते, असे प्रतिपादन आदित्य शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. आदित्य सारडा यांनी केले. आदित्य पॉलीटेक्निकच्या दोन विद्यार्थ्यांची भारतीय नौदलात ‘सेलर (एसएसआर)’ पदावर निवड झालेल्या विद्यर्थांचा सत्कार करतांना ते बोलत होते.
आदित्य शिक्षण संस्थेच्या आदित्य पॉलीटेक्निक, बीड येथील दोन विद्यार्थ्यांनी भारतीय नौदलात ‘सेलर (एसएसआर)” या प्रतिष्ठित पदावर निवड मिळवून संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि मार्गदर्शनाची उंची पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2024 पासआऊट) मधील विद्यार्थी अनिकेत आसाराम राख तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेतील विद्यार्थी सुबोध भागवत औटे (प्रवेश वर्ष 2021-2024) यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा प्राचार्य डॉ. राहुल खडके यांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर करिअरच्या विविध संधींबाबत योग्य दिशा देण्याचा संस्थेचा दृष्टिकोन या निवडीमागे महत्त्वाचा ठरला आहे. या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने अनिकेत राख व सुबोध औटे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे हे यश वैयक्तिक असले तरी, विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या आदित्य पॉलीटेक्निकच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची ही ठळक पावती असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.विद्यार्थ्यांचा सत्कार करताना विभागप्रमुख प्रा गडदे आर.ए., प्रा तांबे एल.टी., प्रा निमगावकर एस.एस., विभागप्रमुख प्रा राऊत डी.एस., प्रा खालापुरीकर जी.एम. उपस्थित होते.
योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीचे यशस्वी फळ – आसाराम राख
आदित्य पॉलीटेक्निकने अनिकेतला शिक्षणकाळात वेळोवेळी योग्य मार्गदर्शन दिले. अभ्यासासोबतच शिस्त, सातत्य आणि करिअरविषयक दिशा मिळाल्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला. अनिकेतचा कष्टाळूपणा, चिकाटी आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांची सांगड घातल्यामुळेच आज त्याला भारतीय नौदलात ‘सेलर (एसएसआर)’पदावर निवड मिळू शकली, अशी भावना वडील आसाराम राख यांनी व्यक्त केली.
करिअर घडविण्याचा प्रामाणिक दृष्टिकोन फलदायी – भागवत औटे
आदित्य पॉलीटेक्निकचा विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य वळण देण्याचा उद्देश अत्यंत प्रामाणिक आणि सकारात्मक आहे. केवळ शिक्षण देणे नव्हे, तर भविष्याच्या संधी ओळखून त्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. याच मार्गदर्शनाचा परिणाम म्हणून माझ्या मुलाची भारतीय सीमा सुरक्षा दलात निवड झाली, असे समाधान व अभिमानाने वडील भागवत औटे यांनी सांगितले.

COMMENTS