पंडित विद्यासागर, रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थितीछ. संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’डिजिटल युगातील कोशीय

पंडित विद्यासागर, रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थिती
छ. संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’डिजिटल युगातील कोशीय लेखन’ या विषयावर वर दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या सहकार्यातून आयोजित या कार्यशाळेत दिडशे भाषा अभ्यासकांचा सहभाग होणार आहे, अशी माहिती संयोजक डॉ सचिन देशमुख यांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व इंटरनॅशनल सटर ऑफ एक्सलेन्स इन इजिनियरिंग अॅड मॅनेजमेंट (आयसीम) यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व 20 जानेवारी रोजी विद्यापीठातील सिफार्ट सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ’डिजिटल युगातील कोशीय लिखाण : संकल्पना तंत्र आणि स्वामित्व हक्क’ या विषयावरीळ कार्यशाळेचे उदघाटन सोमवारी (दि.19) सकाळी 10 वाजता मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डॉ.रवींद्र शोभणे (अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ) यांचे ’मराठी भाषा आणि मराठी विश्वकोष : कोशवाड्ःमय परंपरा’ याविषयी भाषण होणार आहे. तसेच ज्येष्ठ लेखक लक्ष्मीकांत देशमुख (अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती) हे ’माहिती तंत्रज्ञानाचा मराठी ज्ञानभाषा निर्मितीतील योगदान’ या विषयावर विचार मांडतील. तर दुपारच्या सत्रात प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ डॉ.पंडित विद्यासागर (माजी कुलगुरु, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडावा विद्यापीठ) यांचे ’वैज्ञानिक कोशीय लिखाण’ या विषायावर भाषण करणार आहे. या कार्यक्रमास संयोजक प्राचार्य डॉ.संजय डंभारे , प्राचार्य डॉ.रत्नदीप देशमुख, संचालक प्रा.सचिन देशमुख, डॉ.स्नेहा खोब्रागडे यांची उपस्थिती राहील. या दोन दिवशीय कार्यशाळेत मंगळवारी (दि.20) राहुल देशमुख (माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ) यांचे ’कोशीय लिखाण आणि तंत्रज्ञान’ यावर विचार मांडतील. प्रा.रोहिणी कुलकर्णी यांचे ’कोशीय लिखाण कौशल्य आणि शैली’ तसेच डॉ.मिलिंद दुसाने (जिल्हा माहिती अधिकारी) यांचे ’मराठी ज्ञानभाषा आणि माहिती तंत्रज्ञान’ या विषावर विचार मांडणार आहेत. याच दिवशी दुस-या सत्रात प्रा.सुनील भिरुड (कुलगुुरु सीओईपीटी, पुणे) यांचे ’कोशीय लिखाण आणि स्वामित्व हक्क’ तसेच अभ्यासक प्रा.रंजन गर्गे ’कोशीय लिखाण आणि पारिभाषिक संज्ञा’ तसेच प्रा.प्रवीण वक्ते ’स्वामित्व हक्क’ या विषयावर या विषयावर विचार मांडतील.

COMMENTS