परिचारीका भगिनीच ख-या तारणहार-विवेकभैय्या कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

परिचारीका भगिनीच ख-या तारणहार-विवेकभैय्या कोल्हे

जागतिक परिचारिका दिनानिमित्त संजीवनी कोविड केअर सेंटर येथे परिचारिका भगिनींचा त्यांच्या अविरत रुग्णसेवेच्या कार्याप्रती आदरभाव म्हणून कोपरगाव औद्योगिक

महाराजा अग्रसेन यांच्या विचारांची आजच्या काळात नितांत गरज – चंद्रभान अग्रवाल
नगरचे व्यापारी आक्रमक…उपोषण करणार
ट्विटरवर संमतीशिवाय इतरांचे फोटो शेअर करता येणार नाही | DAINIK LOKMNTHAN

.
कोपरगांव  शहर प्रतिनिधी- जागतिक परिचारिका दिनानिमित्त संजीवनी कोविड केअर सेंटर येथे परिचारिका भगिनींचा त्यांच्या अविरत रुग्णसेवेच्या कार्याप्रती आदरभाव म्हणून कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी सन्मान केला.
          गेल्या एक ते दीड वर्षापासून जगभरात कोरोनाचा मोठा उद्रेक झालेला असतांना रुग्णांना जीवनदान देण्यासाठी परिश्रम घेऊन परिचारिका भगिनी रुग्णसेवा करण्याचे धाडसी काम अहोरात्र करत आहेत.सर्वच रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या परिचारिका भगिनी अतिशय मौलिक सेवा देत असून त्यांच्या कार्याबद्दल  सर्वांना आदर असून या भगिनींच्या कर्तृत्वाला माझा सलाम आहे अशी प्रतिक्रिया विवेकभैय्या कोल्हे यांनी यावेळी दिली.
            श्री कोल्हे पुढे म्हणाले की,परिचारिका भगिनी आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतांना रुग्णांची देखील कुटुंबाप्रमाणेच काळजी घेत आहे.कोरोनासारख्या महामारीत  त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असून रुग्णांची सेवा करत असतांना त्यांनी आपली देखील काळजी घ्यावी अशी भावना व्यक्त केली.या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब दवंगे,डॉ.विनयाताई ढाकणे मॅडम,नर्स ज्योतीताई बोऱ्हाडे,छायाताई करपे,ज्योतीताई महाले,डॉ.वैभव कव्हाले,फार्मासिस्ट प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱे रुग्ण हे संजीवनी उद्योग समुहास कुटूंबाप्रमाणेच असल्याचे  मत श्री विवेक कोल्हे यांनी यावेळी व्यक्त करताच उपस्थित परिचारिका भगिनींनी टाळ्यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.श्री कोल्हे संजीवनी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी करीत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली,यावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले.

COMMENTS