Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा स्वखर्चातून लोकसेवेचा उपक्रम; मोरगाव-जाधववस्ती रस्ता झाला सुलभ

निधीअभावी जनतेचे हाल होऊ देणार नाहीत - राजेंद्र मस्केबीड । प्रतिनिधीपाटोदा-मांजरसुंभा मुख्य रस्त्यावरील मोरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत जाधववस्तीला जोड

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले
सर्वच समुहांना दुसऱ्यांचं आरक्षण हवंय !

निधीअभावी जनतेचे हाल होऊ देणार नाहीत – राजेंद्र मस्के
बीड । प्रतिनिधी
पाटोदा-मांजरसुंभा मुख्य रस्त्यावरील मोरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत जाधववस्तीला जोडणार्‍या रस्त्यावर आठ नळ्यांच्या नळकांडी पुलाच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आला. या पुलामुळे जाधववस्तीतील नागरिकांना होणारी वर्षानुवर्षांची गैरसोय कायमची दूर झाली आहे.
या वेळी वामन जाधव, तुकाराम कागदे, आण्णासाहेब कागदे, सचिन जाधव, मजूर फेडरेशनचे संचालक बद्रीनाथ जटाळ, गणपत जाधव, भारत जाधव, बाबासाहेब काकडे, दादाहरी काकडे, सयाजी काकडे, गोविंद काकडे, बाबुराव कागदे, अतुल जाधव, विश्वंभर जाधव, सतीश जाधव, बाळू जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरगाव ग्रामपंचायतीअंतर्गत सुमारे 250 लोकसंख्येची जाधववस्ती मांजरसुंभा-पाटोदा महामार्गालगत आहे. महामार्गाची उंची वाढल्यामुळे वस्तीला जाणारा रस्ता खड्डेमय व उताराचा झाल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत होती. मागील अतिवृष्टीत वस्तीच्या चारही बाजूंनी पाणी साचल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी स्वखर्चातून 6 फूट रुंद व 10 फूट लांबीच्या आठ नळ्यांचा मजबूत नळकांडी पूल उभारण्याचा निर्णय घेतला. निधी किंवा मंजुरीअभावी जनतेचे प्रश्न प्रलंबित राहू नयेत. रस्त्याअभावी नागरिकांचे हाल होऊ नयेत, हाच या कामामागचा उद्देश आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे मोरगाव-जाधववस्ती दरम्यानचा रस्ता सुलभ झाला असून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्थानिक नागरिकांनी राजेंद्र मस्के यांच्या लोकाभिमुख कार्याबद्दल समाधान व्यक्त करत मनःपूर्वक आभार मानले.

COMMENTS