Homeदेशराजकारण

ममता बॅनर्जी घुसखोरी थांबवू शकत नाही; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये 2026 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यां

नक्षल्यांना रोखण्यासाठी मास्टर प्लॅन… मुख्यमंत्र्यांनी मागितला १२०० कोटींचा निधी
महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा
लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा  
Amit Shah

कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये 2026 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी राहील, असे स्पष्ट केले. मंगळवारी कोलकात्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस सरकारवर तीव्र टीका केली.
यावेळी अमित शाह म्हणाले की, निवडणुकीतील राजकीय फायद्यासाठी ममता बॅनर्जी सरकार बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देत आहे. राज्य सरकारकडून जमीन न दिल्यामुळे भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्याचे काम अपूर्ण राहिले असून त्यामुळेच घुसखोरीची समस्या कायम आहे, असा आरोप त्यांनी केला.गेल्या 15 वर्षांत टीएमसी सरकारच्या काळात पश्‍चिम बंगालमध्ये भीती, भ्रष्टाचार आणि कुशासन वाढले असल्याचे शाह यांनी सांगितले. भ्रष्टाचारामुळे राज्याचा विकास थांबला असून केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना टोल सिंडिकेटमध्ये अडकत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.इतर राज्यांच्या सीमांवर घुसखोरी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली असताना पश्‍चिम बंगालमध्ये ती का थांबत नाही, असा सवाल उपस्थित करत शाह यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. लोकसंख्येची रचना बदलून मतपेढी मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. बंगाल सीमेवरील घुसखोरी हा राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मार्च-एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक
पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेचा कार्यकाळ 7 मे 2026 पर्यंत आहे. निवडणुका मार्च-एप्रिल 2026 मध्ये होणे जवळपास निश्‍चित आहे. येथे एकूण 294 जागा आहेत, टीएमसीचे सरकार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आहेत. निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असतांनाच पश्‍चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापतांना दिसून येत आहे.

COMMENTS