Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानच्या नवनियुक्त विश्वस्त मंडळाने स्विकारला पदभार

पाथर्डी : महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द असलेले श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त मंडळाची नियुक्ती अहिल्यानगर जिल्हयाचे प्रमुख जिल्हा व सत्र

‘पाणंद रस्ते’ कामांना गती देण्यासाठी आमदारांच्या समितीला अधिकार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या २७९५ पदांची भरती;
आई-वडिल अशिक्षित असूनही संघरत्न झाला उपशिक्षणाधिकारी
Displaying 1003304512.jpg

पाथर्डी : महाराष्ट्र राज्यात प्रसिध्द असलेले श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानचे विश्वस्त मंडळाची नियुक्ती अहिल्यानगर जिल्हयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी नियुक्ती केली.

 दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पुर्वीचे विश्वस्त मंडळाची मुदत संपल्याने आज मंगळवार दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री मोहटादेवी देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश -४ श्री महेश लोणे व दिवाणी न्यायाधीश श्री रविकिरण सपाटे यांचे उपस्थितीमध्ये नवीन विश्वस्त मंडळाने श्री मोहटादेवीची प्रार्थना करून पदभार स्विकारला. 

मोहटे गावामधुन श्री बाबासाहेब रघुनाथ दहिफळे, श्री शुभम शामराव दहिफळे, श्री शशिकांत रामनाथ दहिफळे, श्री अशोक भगवान दहिफळे, श्री राजेंद्र विठ्ठल शिंदे तर भावीकांमधुन ॲड. श्री. विक्रम लक्ष्मणराव वाडेकर, ॲड.श्री. कल्याण दगडू बडे, ॲड. श्री. प्रसन्न साहेबराव दराडे, श्री श्रीकांत शिवकरण लाहोटी, ॲड. श्रीमती ऋतीका अशोक कराळे या नवीन विश्वस्तांनी पदभार स्विकारला. देवस्थानचे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी सर्वांचे स्वागत केले. देवस्थानचे सध्या सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी देवस्थानचे जनसंर्पक अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदिप घुले व कर्मचारी उपस्थित होते. भावीक भक्तांसाठी विविध सुविधा निर्माण करुन देण्यात येतील,असे उपस्थित विश्वस्तांनी मनोगत व्यक्त केले.

COMMENTS