रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर कोरोना रुग्णवाहिकेसह ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना मोफत डिझेल ; वाळवा तालुक्यातील इटकरे येथील उपक्रम

Homeमहाराष्ट्र

रिलायन्सच्या पेट्रोल पंपावर कोरोना रुग्णवाहिकेसह ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना मोफत डिझेल ; वाळवा तालुक्यातील इटकरे येथील उपक्रम

कोरोना रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनासाठी रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीच्या  वतीने मोफत डिझेल देण्याचा उपक्रम इटकरे, ता. वाळवा येथिल

Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल
कोपरगाव शहरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी  
हत्या करणाऱ्या आरोपीला टोपीच्या सहाय्याने २२ तासात पोलिसांनी केले गजाआड | LOK News 24

 इस्लामपूर / प्रतिनिधी : कोरोना रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनासाठी रिलायन्स बी. पी. मोबिलिटी कंपनीच्या  वतीने मोफत डिझेल देण्याचा उपक्रम इटकरे, ता. वाळवा येथिल रिलायन्स पेट्रोल पंपावरुन करण्यात आला. या योजनेत कोरोना बाधित रुग्ण घेवून जाणार्‍या रुग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनासाठी दररोज 50 लिटरपर्यंत मोफत डिझेल  देण्यात येणार आहे.

याबाबतपत्र सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले. रिलायन्स बी. पी मोबीलिटीचे संचालक निलेश जाधव यांनी दिले. जिल्हा प्रशासन अथवा जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या अधिकृत पत्राद्वारे नोंदणीकृत क्रमांकाच्या वाहनासाठी सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटल रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहतूक करणार्‍या वाहनांना कंपनीच्या जिल्ह्यातील सर्व रिलायन्स पेट्रोल पंपावर या सुविधेचा लाभ घेता येईल. अशी माहिती पंप संचालक निलेश जाधव यांनी दिली.

यावेळी इस्लामपूर तहसीलदार रविंद्र सबनीस, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष संग्रामसिंह दिलीपराव पाटील व रिलायन्स पेट्रोल पंप येलूरचे निलेश जाधव, नितीन जाधव, निशांत जाधव (येलूर) हे उपस्थित होते.

COMMENTS