राज्यात  उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून  संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी : मुख्यमंत्री ; “या” अत्यावश्यक सेवा राहणार सुरु

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू केली आहे. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत.

संगमनेरमध्ये सतराशे किलो गोमांस जप्त
तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन
’बाप लेकीचे नाते’ कवितेने आणले देवळालीकरांच्या डोळ्यात पाणी

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून  संचारबंदी लागू केली आहे.  उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागेल. योग्य कारण नसेल, तर घराबाहेर पडायचं नाही. 

 अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील. पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. तुमच्या कॅम्पसमध्ये कर्मचाऱ्यांची वसाहत असेल आणि तिथल्या तिथे वाहतूक होत असेल, तर त्याला परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.राज्य सरकार म्हणून अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ७ कोटी लाभार्थ्यांना पुढचा महिनाभर प्रतिव्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत दिले जातील. शिवभोजन थाळी १० रुपयांत सुरू केली होती. कोविड आल्यानंतर ती ५ रुपये केली. 

COMMENTS