महागाईने सामान्यांचे मोडणार कंबरडे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महागाईने सामान्यांचे मोडणार कंबरडे

सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाळेबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत.

ओबीसींचे हक्क मिळेपर्यंत लढा सुरु ठेवणार – ना.विजय वडेट्टीवार
जामखेड तालुक्यात 74 कोटी 65 लाख पीक कर्ज वाटप ः अमोल राळेभात
राज्यात झिका आजाराचा पहिला रुग्ण आढळला

नवी दिल्लीः सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाळेबंदीमुळे अनेकांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. हातावरचे पोट असणार्‍यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.  

    अशातच सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाकडून घाऊक महागाईच्या दराची आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. घाऊक बाजारात महागाई दर पाहता चिंता वाढली आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील महागाई दर वाढला आहे. मार्च महिन्यात महागाई दर हा 7.39 टक्के इतका होता, तर एप्रिलमध्ये या दराने रेकॉर्ड मोडला आहे. महागाई दर तब्बल 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. महागाई दरात एका महिन्यात जवळपास 3.1 टक्क्यांची वाढ झाली आहे. कच्चे तेल आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती वाढल्याने हा महागाई दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांची आकडेवारी दिली आहे. फेब्रुवारीत महागाई दर 4.83 टक्के इतका होता. त्यानंतर मार्च महिन्यात महागाई दर 2.56 टक्क्यांनी वाढला आणि 7.39 टक्क्यांवर पोहोचला, तर मार्च महिन्याच्या तुलनेत महागाई दर 3.1 टक्क्यांनी वाढला असून तो आता 10.49 टक्क्यांवर पोहोचला आहे. डाळी, फळे, अंडी-मांस, पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गहू, तांदूळ, भाज्या, कांदे-बटाटे यांच्या किंमतीत घट झाली आहे.

COMMENTS